Home /News /viral /

कॅमेरा होता म्हणून वाचला तरूण, अन्यथा पडला असता मार! पाहा VIDEO

कॅमेरा होता म्हणून वाचला तरूण, अन्यथा पडला असता मार! पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) तरूणी त्यांच्या बाईकवरून रस्त्यावरून जात आहेत. अचानक त्यांच्या बाईकचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे त्या रस्त्यावर पडतात

    मुंबई, 20 जून : सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग हा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी झाला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यामुळे तरूणाची मारहाण वाचली आहे. कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण प्रसंगाचं रेकॉर्डिंग झाले नसते तर या तरूणाची धुलाई निश्चित होती. काय आहे व्हिडीओ? या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) तरूणी त्यांच्या बाईकवरून रस्त्यावरून जात आहेत. अचानक त्यांच्या बाईकचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे त्या रस्त्यावर पडतात. त्यांच्या बाईकला कोणत्याही वाहनानं धक्का दिलेला नाही. त्या स्वत:हूनच खाली पडल्याचं या  व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण, या मुलींना तसं वाटत नाही. त्या तरूणींनी पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकावर धक्का दिल्याचा आरोप केला. 'तुम्हाला दिसत नव्हतं का? असा प्रश्न त्यांनी त्या तरूणाला विचारला. त्यावर दीदी बाईकची धडक झालेली नाही, असं स्पष्टीकरण तो तरूण देतो. या स्पष्टीकरणानंतरही त्या मुलींचे समाधान होत नाही. धक्का न देता गाडी कशी पडली? असा प्रश्न ते विचारतात. त्यावर मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो, असं उत्तर तरूण देतो. त्यावर या तरूणी गप्प बसतात. वडिलांनी स्वप्नात दिली खजिन्याची माहिती, मुलाला सापडली 4 कोटींची चोरी न्यूज 18 मध्य प्रदेशचे रिपोर्टर जितेंद्र शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Social media, Twitter, Video viral

    पुढील बातम्या