यहाँ के हम सिकंदर..! 8 तासांच्या प्रवासात विमानात एकटाच प्रवासी, एअर हॉस्टेसकडून मिळाली स्पेशल ट्रिटमेंट
यहाँ के हम सिकंदर..! 8 तासांच्या प्रवासात विमानात एकटाच प्रवासी, एअर हॉस्टेसकडून मिळाली स्पेशल ट्रिटमेंट
Flight
अनेकांना विमान प्रवास (Flight)कंटाळवाणा वाटतो. जरी हा प्रवास एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलद आणि सोयीस्करपणे असला तरी अनेकांना हा प्रवास नकोसा वाटतो. पण एका व्यक्तीचा एकट्याचा प्रवास आणि त्याला मिळालेली खास सुविधा ऐकलात तर म्हणाल मला ही एकट्याने प्रवास करायचा आहे.
नवी दिल्ली, 16 जानेवारी: अनेकांना विमान प्रवास (Flight)कंटाळवाणा वाटतो. जरी हा प्रवास एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलद आणि सोयीस्करपणे असला तरी अनेकांना हा प्रवास नकोसा वाटतो. पण एका व्यक्तीचा एकट्याचा प्रवास आणि त्याला मिळालेली खास सुविधा ऐकलात तर म्हणाल मला ही एकट्याने प्रवास करायचा आहे. पण एकट्याने विमान प्रवास करण्याची ही संधी चुकून मिळते. तर जाणून घेऊया 8 तासांच्या फ्लाइटमध्ये केवळ एकट्याने प्रवास (Lad Reveals 'Weird Experience' After Being Only Passenger On 8-Hour Flight)केलेल्या व्यक्तीच्या अनुभवाविषयी.
डर्बी येथे राहणारे काई फोरसिथसोबत( Kai Forsyth)एक चकित करणार किस्सा घडला. ब्रिटिश एअरलाइन्सने लंडनहून ऑर्लॅंडोला उड्डाण केले होते. आठ तासांच्या या प्रवासात काई हा एकमेव प्रवासी होता. शिक्षण घेत असलेला काईला तो एकटाच प्रवास करेल याची कप्लनासुद्धा नव्हती. त्यावेळी काईला एकट्याने प्रवास करण्याचा अनुभव घेता आला. संपूर्ण विमानात त्याच्याशिवाय दुसरा प्रवासी नव्हता.
Only Passenger On 8-Hour Flight
काईने हा अनुभव त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे. काईने सांगितले की 10 जानेवारी रोजी तो त्याच्या घरातून अमेरिकेला गेला, जिथे तो शिकतो. पण विमानामध्ये आपण एकटेच आहोत हे पाहून त्याला धक्का बसला. केबिन क्रूकडून कळले की फ्लाइटमध्ये तो एकमेव प्रवासी होता. सुरुवातीला त्याला विचित्र वाटले पण नंतर काईने मनसोक्त विश्रांती घेतली.
काईने सांगितले की, या प्रवासादरम्यान केबिन क्रूने त्याला अनेक सुविधा दिल्या. त्याला अनलिमिटेड जेवण. . याशिवाय सीटचे बेडमध्ये रुपांतर करून आरामात झोपण्याची संधी. अशा अनेक सुविधा काईला या प्रवासादरम्यान मिळाल्या. काईच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात आरामदायक फ्लाइट होती. लोक त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला भाग्यवान म्हटले आहे. मात्र, काईने यापुढे एकट्याने प्रवास न करणे पसंत करेल. असे म्हटले आ
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.