मराठी बातम्या /बातम्या /Viral /कोमोडो ड्रॅगनने हरणाला जिवंत गिळलं, शिकारीचा धक्कादायक Video समोर

कोमोडो ड्रॅगनने हरणाला जिवंत गिळलं, शिकारीचा धक्कादायक Video समोर

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

जगभरात प्राण्यांच्या अनेक निरनिराळ्या प्रजाती आहेत. एकापेक्षा एक भयंकर प्राणी अस्तित्वात असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 मार्च : जगभरात प्राण्यांच्या अनेक निरनिराळ्या प्रजाती आहेत. एकापेक्षा एक भयंकर प्राणी अस्तित्वात असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. काही आश्चर्यकारक आणि भयानक वन्यजीवांचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात. अंगावर काटा आणणारे शिकारीचे थरारक व्हिडीओ कायमच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. असाच एक शिकारीच्या भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

नुकताच असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक भयानक कोमोडो ड्रॅगन हरणाची शिकार करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक भयंकर कोमोडो ड्रॅगन हरणाची शिकार करताना दिसत आहे. यादरम्यान तो हरणाला जंगलात घेऊन जातो आणि नंतर हरणाला जिवंत गिळू लागतो. जे पाहून युजर्सची चांगलीच तारांबळ उडाली. कोमोडो ड्रॅगन त्यांच्या शिकारला निर्दयी मृत्यू देण्यासाठी ओळखले जातात.

कोमोडो ड्रॅगनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंटही येत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अॅनिमल्स पॉवर नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वीही प्राण्यांच्या भयानक शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. शक्तिशाली शिकारी दुर्बल प्राण्याची शिकार करतो आणि त्यांना नष्ट करतो असे प्राण्यांचे भयानक व्हिडीओ चर्चेत असतात. काळजाचा ठोका चुकवणारी शिकारही कायम चर्चेत असते. लोकांना प्राण्यांविषयी असणारं आकर्षण आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी ते जंगल सफारी, पार्कमध्ये जात असतात.

First published:

Tags: Shocking news, Shocking video viral, Videos viral, Viral