कोलकाता, 05 फेब्रुवारी: लग्नामध्ये आजकाल विविध प्रकारचं फोटोशूट (Photo shoot) करण्याची फॅशन आली आहे. याचबरोबर लग्नामध्ये विविध प्रकारच्या आणि डिझाईनच्या लग्नपत्रिका (Wedding Card) देखील पाहायला मिळत असतात. कोलकात्याच्या एका जोडप्यानं देखील अशाच पद्धतीनं आपल्या लग्नामध्ये काहीतरी नवीन करायचं ठरवलं होतं. परंतु त्यांनी लग्नपत्रिकेमध्ये नाविन्यपूर्ण काही करण्याऐवजी अनोख्या पद्धतीचं मेन्यूकार्ड (Menu Card) तयार केलं आहे. लग्नामध्ये त्यांनी आधार कार्डप्रमाणं (Aadhar Card) मेन्यूकार्ड तयार केलं असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या मेन्यूकार्डचा (Menu Card) फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा फोटो वेगानं व्हायरल झाला असून सध्या याला खूप पसंती मिळत आहे. कोलकात्याच्या राजरहट भागातील सुवर्णा दास आणि गोगोल सहा असं या जोडप्याचं नाव आहे. याविषयी एका स्थानिक ऑनलाईन पोर्टलबरोबर बोलताना त्यांनी त्यांची ही अनोखी कल्पना व्हायरल झाल्याचा आम्हाला आनंद होत असून यामुळं ते खूप उत्साहित आहेत, असं सांगितलं. या कल्पनेमागं आपल्या पत्नीचा हात असल्याचं सहा यांनी सांगितलं. दोघही डिजिटल इंडियाचे (Digital India) समर्थक असल्यानं आपल्या लग्नामध्ये देखील अशाच पद्धतीनं काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती.
(हे वाचा-...आणि अजिबात चालता न येणारा कुत्रा धावू लागला, भावुक करणारा VIDEO VIRAL)
त्यांच्या या आधारडकार्ड मेन्यूची कल्पना लग्नातील नातेवाईक आणि सहभागींना देखील आवडली असल्याचं त्यांनी म्हटलं. लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी कशापद्धतीने आधारकार्डची गरज पडू शकते यावर देखील अनेक विनोद करण्यात आले. सोमवारी हे जोडपं विवाहबद्ध झालं असून यामधील सुवर्णा ही आरोग्यसेविका असून गोगोल हा सेल्स आणि मार्केटिंग प्रोफेशनल आहे.
अशा पद्धतीनं विवाह करण्याची कल्पना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक जणांनी आपल्या लग्नामध्ये अशा पद्धतीनं विविध नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केला आहे. मागच्या वर्षी फिलीपिन्समधील एका जोडप्यानं लोकप्रिय वेब सीरिज Money heist वर आधारित फोटोशूट केलं होतं
(हे वाचा - प्रियकराबरोबर रचला कट, पत्नीने पतीचा खून करून बॉक्स बेडमध्ये आठवडाभर लपवून ठेवला मृतदेह)
28 वर्षीय अँड्र्यू रोलिओ आणि इनेझ जेड क्विल यांनी प्री वेडिंग फोटोशूटमध्ये Money heist सिरीजमधील रेड जम्पसूट आणि साल्वाडोर मास्कसारखे कपडे घातले होते. स्पेनच्या रॉयल मिंटप्रमाणं हुबेहूब दिसणाऱ्या फिलीपिन्समधील सेबू शहरातील लेअ मंदिरात हे फोटोशूट करण्यात आलं होतं. यामध्ये बनावट बंदुका आणि विविध प्रकारच्या मुखवट्यांचा देखील हुबेहूब वापर करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Kolkata, Wedding