मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चालू ट्रेनमधून 2 तरुणींनी मारली उडी आणि...पाहा श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

चालू ट्रेनमधून 2 तरुणींनी मारली उडी आणि...पाहा श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

या दोन्ही महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 45 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या दोन्ही महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 45 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या दोन्ही महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 45 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

कोलकाता, 28 डिसेंबर : अनेकदा जीव धोक्यात घालून लोकल किंवा रेल्वे गाडीतले स्टंट समोर येत असतात. तर काही वेळा अनावधानानं अपघात होत असतात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वारंवार धावत्या ट्रेनमधून न उतरण्याचं आवाहन केलं जातं आणि फलाट आणि गाडीतील अंतर पाहून उतरावं असं सांगूनही अनेकदा प्रवासी ऐकत नाहीत अशावेळी जीव धोक्यात घालून ट्रेनमधून उतरतात अशीच एक थरारक घटना समोर आली आहे.

लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन महिलांनी धावत्या ट्रेनमधून उडी घेत उतरल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन महिला ट्रेनचा स्पीड कमी होत असल्याचं लक्षात घेऊन खाली रुळावर उडी मारत उतरतात. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत होत नाही किंवा समोरून कोणतीही दुसरी ट्रेन येत नसल्यानं अपघात देखील झाला नाही. मात्र रेल्वे रुळावर अशा पद्धतीनं उतरणं धोक्याचं आहे हे माहीत असून देखील त्यांनी जीव धोक्यात घालून उतरण्याचं धाडस केलं.

हे वाचा-मुक्या जीवाचा आधार बनला अभिजित! भटक्या कुत्र्यांसाठी जुन्या TVचं केलं घर

या दोन्ही महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 45 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 500 हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेक युझर्सनी संताप व्यक्त करत अशा लोकांना सांगून काही फायदा नाही सोडून द्यावं अशा कमेंट्स केल्या आहेत.

भीती आणि आपल्या जीवावर बेतेल हे या जणू दोन महिलांच्या डोक्यांतच नसावं बहुतेक. या दोन्ही महिला आपला जीव धोक्यात घालून ट्रेनमधून उडी मारून उतरतात. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हे कसबीचं आणि जोखमीचं काम या दोन महिलांना जमलं असलं तरी देखील अशा पद्धतीनं उतरणं जीवघेणं ठरू शकतं. असे कोणतेही स्टंट अथवा अशा पद्धतीनं प्रवाशांनी ट्रेन किंवा लोकलमधून उतरू नये त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं न्यूज 18 लोकमत आवाहन करत आहे.

First published:

Tags: Viral video.