• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Knowledge Story: 1 लिटर पाण्याच्या किमतीत येईल 2 BHK फ्लॅट, का आहे इतकं महाग?

Knowledge Story: 1 लिटर पाण्याच्या किमतीत येईल 2 BHK फ्लॅट, का आहे इतकं महाग?

काही दिवसांपूर्वीच आपण विराट-मलायका हे सेलिब्रिटी महागडं ब्लॅक वॉटर (Black Water) पितात अशी बातमी वाचली असेल किंवा टीव्हीवर पाहिलीही असेल.

 • Share this:
  Knowledge Story : काही दिवसांपूर्वीच आपण विराट-मलायका हे सेलिब्रिटी महागडं ब्लॅक वॉटर (Black Water) पितात अशी बातमी वाचली असेल किंवा टीव्हीवर पाहिलीही असेल. तुम्हाला जर वाटत असेल, की ब्लॅक वॉटर हे जगातील सगळ्यात महागडं पाणी आहे, तर थोडं थांबा. आज आम्ही तुम्हाला अशा एका पाण्याच्या बाटली (World’s costliest water bottle) बद्दल सांगणार आहोत, जिच्या किंमतीमध्ये चक्क 2BHK फ्लॅटही विकत घेता येईल. कोणतं आहे हे पाणी, आणि काय आहे याची खासियत? जाणून घेऊयात. बाटलीची किंमत आहे 45 लाख रुपये जगातील सर्वात महागड्या अशा या पाण्याचं नाव ‘ॲक्वा दी ख्रिस्टेलो ट्रिब्युटो ए मोडिग्लियानी’ (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) असं आहे. या पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल 45 लाख रुपये (60 हजार डॉलर्स) आहे. एवढ्या पैशांमध्ये एखाद्या शहरात आरामात 2BHK फ्लॅट (60 thousand dollars water bottle) घेता येऊ शकेल. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम मोजून घेतलेल्या बाटलीमध्ये एक लिटरही पाणी नसतं. ही बाटली अवघ्या 750 मिलीलीटर क्षमतेची आहे. इन अ बॉटल (In a bottle) या वेबसाईटने या पाण्याबाबत माहिती दिली आहे. हे पाणी फ्रान्स आणि फिजीमध्ये असलेल्या नैसर्गिक झऱ्याचं (Natural Springs water) असतं. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केवळ पाण्यात नाही, तर बाटलीमध्येही दडलंय किंमतीचं गुपित या पाण्याच्या बाटलीची किंमत एवढी जास्त असण्यामागे कित्येक कारणं आहेत. त्यातील एक महत्त्वाचं कारण ही बाटलीच आहे. ही प्लॅस्टिक, काच किंवा स्टीलची नाही तर चक्क 24 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलेली बाटली (24 karate gold water bottle ) आहे. जगप्रसिद्ध बाटली डिझायनर फर्नांडो अल्तामिरानो यांनी ही बाटली तयार केली आहे. जगातील सर्वात महागडी बाटली ‘कॉन्यॅक ड्युडोगन हेरिटेज हेन्री 4’ हीदेखील फर्नांडो यांनीच डिझाईन केली होती. पाण्याची चव तर चांगलीच पण आरोग्यासाठीही फायदेशीर या नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याची चव इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगली असल्याचे म्हटले जाते. यासोबतच, साध्या पाण्याच्या तुलनेत हे पाणी कित्येक पटींनी अधिक एनर्जी देत असल्याचेही सांगण्यात येतं. इन अ बॉटल या वेबसाईटवर या पाण्याविषयी आणि बाटलीविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. हे ही वाचा-पार्टीबहाद्दर डॉगी! प्रत्येक पार्टीत झोडतो स्वतःचं फेव्हरेट Drink पाणी हे अमूल्य असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण याच अमूल्य पाण्यासाठी 45 लाख रुपये खर्च करण्याची तुमची तयारी आहे का?

  First published: