मराठी बातम्या /बातम्या /Viral /Knowledge : शॉपिंग करण्यासाठी वापरली जाणारी ट्रॉली जाळीदार का असते?

Knowledge : शॉपिंग करण्यासाठी वापरली जाणारी ट्रॉली जाळीदार का असते?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या ट्रॉलीला कधी नीट पाहिलीय? या ट्रॉलीला बारीक जाळी असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण ही बारीक जाळी का असते? ती ट्रॉली पूर्ण पॅक का नसते? असा कधी विचार केलाय?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : तुम्ही सामान खरेदी करण्यासाठी एकदातरी मॉलमध्ये गेले असणार, तसेच तुम्ही सिनेमा किंवा टीव्हीवर लोकांना मॉलमध्ये शॉपिंग करताना पाहिले असणार. डीमार्ट, रिलायन्स फ्रेश, सहकारी भंडार, बिग बजार सारख्या ठिकाणी लोक सामान ठेवण्यासाठी एक ट्रॉली वापरतात, ज्यामध्ये ते आपल्याला हवं असलेलं सामान ठेवतात. तसेच ते एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेता येते.

पण तुम्ही या ट्रॉलीला कधी नीट पाहिलीय? या ट्रॉलीला बारीक जाळी असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण ही बारीक जाळी का असते? ती ट्रॉली पूर्ण पॅक का नसते? असा कधी विचार केलाय?

मच्छर मारणाऱ्या बॅटमध्ये किती व्होल्टचा करंट असतो? त्याचा झटका बसला तर काय होईल?

खरेदी करताना सामान वाहून नेणारी ही ट्रॉली केवळ डिझाईनसाठी अशी बनवली गेली आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तसं अजिबात नाही. वास्तविक, या ट्रॉल्या बनवण्यामागे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे त्यांचे वजन कमी करणे.

होय, जर या ट्रॉल्या पूर्णपणे बंद केल्या तर त्यामध्ये जास्त धातू वापरला जाईल. अशा परिस्थितीत त्यांचे वजनही वाढेल. त्यामुळे जर या ट्रॉल्या जाळीदार केल्या तर त्यांना बनवण्यासाठी धातूचा वापर कमी केला जातो आणि त्यांचे वजनही कमी होते. तसेच, लोक त्यांना सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात.

यासोबतच त्यांना जाळी बनवण्याचे एक कारण म्हणजे ते बंद ट्रॉलींपेक्षा अधिक सहजतेने साफ करता येतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने बंद ट्रॉलीमध्ये दूध किंवा ज्यूस सारखी एखादी वस्तू ठेवली आणि ते सांडले, तर ते साफ करणे खूप कठीण होते. पण त्या जागी जाळीची ट्रॉली असेल तर तिची साफसफाई सहज करता येते.

First published:
top videos

    Tags: Shopping, Social media, Top trending