मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Ajab Gajab : जगातील असे देश, जेथे विमानतळच नाही...

Ajab Gajab : जगातील असे देश, जेथे विमानतळच नाही...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २७ नोव्हेंबर : एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असले तर आपल्या डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे विमान. आपल्याला हे माहित आहे की विमान आपल्याला कोणत्याही ठिकाणी अगदी कमीत कमी वेळेत पोहोचवू शकतो. हे थोडं खर्चिक आहे. पण दुसरे पर्याय फार कमी असल्याने लोकांना ते परवडतं.

पण तुम्हाला माहिती आहे का की जगात असे अनेक देश आहेत, जिथे एकही विमानतळ नाही. हो हे खरं आहे... पण आता प्रश्न असा उपस्थीत राहातो की मग येथील लोक दुसऱ्या देशात कसे जात असतील? आणि हे कोणते देश आहेत? चला सविस्तर जाणून घेऊ

हे ही वाचा : Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग करते, नवऱ्याला कळलं तेव्हा...

1. ऍडोरा (Andorra)

स्पेन आणि फ्रान्स दरम्यानचा हा छोटासा देश पेरेनीज (Pyrenees mountains)पर्वतांमुळे हा देश संपूर्ण युरोपपासून तुटलेला आहे. हा देश पूर्णपणे पर्वतांवर वसलेला आहे, ज्याची उंची ३००० फुटांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या देशाकडे स्वत:चे ऑपरेशनल विमानतळ नाही.

या देशात जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ प्रिंसिपॅलिटी आहे, जो सुमारे या देशापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.

2. लिक्टनस्टाइन (Liechtenstein)

लिक्टनस्टाइन प्रिन्सिपलिटी हा देश देखील डोंगराळ भागाच्या मधोमध वसलेला आहे. याचे क्षेत्रफळ १६० चौरस किलोमीटर आहे. या देशाच्या गुंतागुंतीच्या जागेमुळे येथे विमानतळ बांधणं शक्य नाही. येथे जाण्यासाठी फक्त बस किंवा कॅबने जावं लागतं. या देशातील लोकांसाठी झुरिच विमानतळ हा पर्याय आहे. जो १२० किलोमीटर अंतरावर आहे.

3. द व्हॅटिकन सिटी (The Vatican City)

व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान शहर असल्याचे म्हटले जाते. या देशाचे क्षेत्रफळ ०.४४ चौरस किलोमीटर आहे. हा देश रोमच्या मधोमध वसलेला आहे. ते ना समुद्राने जोडलेले आहे ना हवाईमार्गाने. विमानाने प्रवास करण्यासाठी लोकांना फ्युमिसिनो आणि सियाम्पिनो विमानतळांवर जावे लागते, तेथे रेल्वेने पोहोचण्यासाठी 30 मिनिटांपर्यंतचा कालावधी लागतो.

4. मोनाको प्रिंसिपॅलिटी (Monaco Principality)

या देशही विमानतळ नाही. मात्र, रेल्वेच्या माध्यमातून तो इतर देशांशी जोडलेला आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. या देशाचा शेजारील देश नाईसशी विमानसेवेसाठी करार आहे. येथे हवाई प्रवास नाईस येथूनच पूर्ण केला जाऊ शकतो .

5. सॅन मारिनो (San Marino)

सॅन मारिनो व्हॅटिकन सिटी आणि रोमजवळ स्थित आहे. हा देशही इटलीने वेढलेला आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोही ना समुद्राने जोडलेला आहे ना हवाईमार्गे. या देशाचे क्षेत्रफळ 40 किलोमीटरपेक्षा कमी आहे, त्यामुळे विमानतळ बांधण्यासाठी जागा नाही.

देशाच्या सर्वात जवळचे विमानतळ रिमिनी हे १६ किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय व्हेनिस, पिसा, फ्लोरेन्स आणि बोलोंगना या ठिकाणच्या विमानतळांचा पर्यायही लोकांकडे शिल्लक आहेत.

First published:

Tags: Airport, Shocking news, Social media, Top trending, Viral