Home /News /viral /

जुनं असो वा नवं, पुस्तकाचा वास घेणं तुम्हालाही आवडतं का? हे आहे कारण

जुनं असो वा नवं, पुस्तकाचा वास घेणं तुम्हालाही आवडतं का? हे आहे कारण

पुस्तकांना इतका चांगला वास येण्यामागील कारण काय आहे, ते आता जाणून घेऊया. पेपरमध्ये सेल्युलोज आणि लिग्निन कमी प्रमाणात असतात

    जर तुम्हाला पुस्तके वाचण्याची आवड असेल, तर तुम्ही ती विकत घेताच सर्वात आधी त्यांचा वास (Books Smell) नक्कीच घेत असाल. एवढेच नाही तर कधी तुम्ही तुमचे पुस्तकांचे कपाट उघडले तर त्यावेळीही जुन्या पुस्तकांचाही वास घेतल्याशिवाय, तुम्ही राहत नसाल. आल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकांमधून चांगला वास येतो. त्यामुळे अनेक जण त्याचा वास घेतात. मात्र, तुम्हाला पुस्तकांत असलेल्या वासाचे कारण माहिती आहे? नाही ना. मग जाणून घ्या, काय आहे यामागचे कारण? अनेक जणांना जुन्या पुस्तकांचा वास आवडतो. (Reason for old books smell) तर काही जणांना नव्या पुस्तकांचा वास आवडतो. (Why new books smell good) जुन्या पुस्तकांतून येणारा सुगंध हा अनेक रासायनिक संयुगांच्या विघटनाने येतो. पुस्तके बराच काळ बंद ठेवली की ही संयुगे तुटतात. त्याच वेळी, नवीन पुस्तकांच्या उत्पादनात अनेक रसायने वापरली जातात, त्यामुळे त्याचा वास येतो या कारणामुळे पिवळ्या रंगाचा होतो कागद - पुस्तकांना इतका चांगला वास येण्यामागील कारण काय आहे, ते आता जाणून घेऊया. पेपरमध्ये सेल्युलोज आणि लिग्निन कमी प्रमाणात असतात. हे सुगंधी अल्कोहोलचे एक जटिल पॉलिमर आहे. पातळ असलेल्या कागदात लिग्निन कमी असते, तर स्वस्त आणि जाड कागद, जसे की वर्तमानपत्रात लिग्निन जास्त असते. जास्त प्रमाणात लिग्निनमुळे वर्तमानपत्रांचा रंग कालांतराने पिवळा होतो. याचे कारण असे की कालांतराने लिग्निनचे ऑक्सिडीकरण होते जे अॅसिडमध्ये बदलते आणि हे अॅसिड सेल्युलोजचे विघटन करते. हेही वाचा - Diet Tips: 40 वर्षानंतर आहाराची काळजी घ्याच; एक्सपर्टसने सांगितलेल्या या 3 सोप्या टिप्स वापरा कोणत्या रसायनांमुळे वास येतो? सायन्स एबीसी वेबसाइटच्या अहवालानुसार, जुन्या पेपरमध्ये benzaldehyde, vanillin, ethyl hexanaol, toluene आणि ethyl benzene या रसायनांमुळे वास येतो. ही संयुगे कालांतराने रासायनिक अभिक्रियामुळे तयार होतात, ज्याला आम्ल हायड्रोलिसिस असेही म्हणतात. त्याच वेळी, नवीन पुस्तकात सोडियम हायड्रॉक्साईड असतो, ज्यामुळे पुस्तकांना सुगंध येतो. याशिवाय कागद बनवण्यासाठी इतरही अनेक रसायने वापरली जातात. चॉकलेट आणि कॉफीमध्येही जुन्या पुस्तकांप्रमाणेच अस्थिर सेंद्रिय संयुगे (organic compound) देखील असतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या