मराठी बातम्या /बातम्या /Viral /ट्रेनमध्ये गर्भवतीला सुरू झाल्या प्रसूती वेदना; महिलाही मदतीसाठी आल्या नाही, शेवटी तृतीयपंथीयांनी केलं मन जिंकणारं काम

ट्रेनमध्ये गर्भवतीला सुरू झाल्या प्रसूती वेदना; महिलाही मदतीसाठी आल्या नाही, शेवटी तृतीयपंथीयांनी केलं मन जिंकणारं काम

रेल्वेच्या ज्या डब्यात गर्भवती महिला वेदनेनं ओरडत होती, काही वेळानं तृतीयपंथीयांचा एक गट पैसे मागण्यासाठी त्याच डब्यात पोहोचला. तोपर्यंत रेल्वे सिमुलतला रेल्वे स्थानकावर पोहोचली होती.

रेल्वेच्या ज्या डब्यात गर्भवती महिला वेदनेनं ओरडत होती, काही वेळानं तृतीयपंथीयांचा एक गट पैसे मागण्यासाठी त्याच डब्यात पोहोचला. तोपर्यंत रेल्वे सिमुलतला रेल्वे स्थानकावर पोहोचली होती.

रेल्वेच्या ज्या डब्यात गर्भवती महिला वेदनेनं ओरडत होती, काही वेळानं तृतीयपंथीयांचा एक गट पैसे मागण्यासाठी त्याच डब्यात पोहोचला. तोपर्यंत रेल्वे सिमुलतला रेल्वे स्थानकावर पोहोचली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Bihar, India

    पाटणा 17 जानेवारी : रस्त्यावर, सिग्नलवर, रेल्वेमध्ये लोकांच्या डोक्यावर मायेनं हात ठेवून चार पैसे मागणारा तृतीयपंथीय समाज. पण, या समाजाबद्दल लोकांमध्ये विविध समज आहेत. रेल्वेमध्ये पैसे मागण्यासाठी आल्यानंतर काहीजण तर अशा तृतीयपंथी लोकांना तुसडेपणाची वागणूक देतात. मात्र, बिहारमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान या तृतीयपंथीयांनी जे काही केलं, ते समजल्यानंतर तुम्हालाही त्यांचा आदर वाटल्याशिवाय राहणार नाही.

    ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. रेल्वेमध्ये तृतीयपंथी पाहिल्यावर सहसा लोक पाठ फिरवतात. लोकांना असं वाटतं की, ते त्यांच्याशी गैरवर्तन करू शकतात. पण काल, सोमवारी (16 जानेवारी 2023) रेल्वेत तृतीयपंथीयांनी असं काही केलं, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रेल्वेमध्ये प्रसूती वेदनांनी ओरडणाऱ्या एका महिलेसाठी हे तृतीयपंथी एकप्रकारे देवच बनून आले आणि त्यांनी त्या महिलेची प्रसूती करून समाजासमोर एक आदर्श ठेवलाय.

    मस्करीत दुचाकीला बांधलं मग अचानक गाडी सुरू केली अन्..; पतीचं गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य

    प्रसूतीनंतर महिला आणि बाळ दोघांची प्रकृती ठीक असून तृतीयपंथीयांनी या मुलाला आशीर्वाद दिले आणि संबंधित महिलेच्या पतीला आर्थिक मदतही केली. पण बिहारमधील जमुईला घडलेल्या या घटनेची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे.

    नेमकं काय घडलं?

    शेखपुरा जिल्ह्यातील एक गर्भवती महिला तिच्या पतीसोबत हलवाडा-पाटणा जनशताब्दी एक्सप्रेसनं हावडाहून लखीसरायला जात होती. जसिडीह रेल्वे स्थानकावरून ट्रेन सुरू होताच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. संबंधित महिला वेदनेनं ओरडू लागली. पत्नीची प्रकृती खालावत असल्याचं पाहून तिच्या पतीनं डब्यात उपस्थित असलेल्या इतर महिला प्रवाशांची मदत मागितली. मात्र, संबंधित महिलेच्या मदतीसाठी प्रवाशांपैकी एकही महिला पुढे आली नाही. दुसरीकडे, प्रसूती वेदनेनं संबंधित महिलेची प्रकृती गंभीर होत होती.

    तृतीयपंथी रेल्वेमध्ये आले आणि..

    रेल्वेच्या ज्या डब्यात गर्भवती महिला वेदनेनं ओरडत होती, काही वेळानं तृतीयपंथीयांचा एक गट पैसे मागण्यासाठी त्याच डब्यात पोहोचला. तोपर्यंत रेल्वे सिमुलतला रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तृतीयपंथीयांची नजर प्रसूती वेदनेनं ओरडणाऱ्या महिलेवर पडताच, ते सर्व तिला मदत करण्यासाठी पुढे आले. या तृतीयपंथीयांनी तात्काळ महिलेला उचलून रेल्वे डब्यात असणाऱ्या वॉशरूममध्ये नेलं, थोड्या वेळानं महिलेची प्रसूती झाली आणि तिनं एका गोडस मुलाला जन्म दिला. बाळ आणि संबंधित महिला सुखरूप पाहून रेल्वेमध्ये असणाऱ्या इतरांच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले.

    दरम्यान, समाजात तृतीयपंथींना हिजडा, किन्नर वा छक्का अशा विविध नावानं ओळखलं जातं. तृतीयपंथींबद्दल समाजात नेहमीच अनेकजणांमध्ये नावडती भावना आहे. पण बिहारमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान तृतीयपंथीयांनी असं काही काम केलं आहे, ज्यामुळे समाजासमोर एक आदर्श ठेवला गेलाय.

    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant woman, Viral news