मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! सापाने चक्क स्वतःलाच जिवंत गिळलं; कधीच पाहिला नसेल असा SHOCKING VIDEO

OMG! सापाने चक्क स्वतःलाच जिवंत गिळलं; कधीच पाहिला नसेल असा SHOCKING VIDEO

सापाने केलेल्या बऱ्याच शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल.

सापाने केलेल्या बऱ्याच शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल.

सापाने केलेल्या बऱ्याच शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 डिसेंबर : सापाच्या (Snake video) शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. माणसांवर हल्ला करताना, प्राण्यांना जिवंत गिळताना तुम्ही सापाला पाहिलं असेल. पण कधी सापाने स्वतःवरच हल्ला केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? (Snake attack video) वाचूनच आश्चर्य वाटलं ना (Shocking video viral). पण अशा एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात साप स्वतःच स्वतःला गिळताना दिसला आहे (Snake swallowing itself).

माणूस असो वा प्राणी प्रत्येकाची जगण्याची धडपड असते अशात साप स्वतःवर कसा काय हल्ला करू शकतो असंच तुम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्हाला यावर तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. खरंतर व्हिडीओ पाहूनही  आपण जे पाहत आहोत ते खरं आहे का?  आपला आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक साप गोलाकार आकारात बसलेला दिसतो आहे. त्याच्या शेपटीजवळचा भाग दिसत नाही. हाच भाग या सापाने आपल्या जबड्यात घेतला आहे.

हे वाचा - जन्मताच 24 तास खतरनाक सापांशी संघर्ष; जंगलात भयंकर अवस्थेत सापडली नवजात चिमुकली

हा किंगस्नेक  (Kingsnake) आहे.त्याचा मालक रॉब क्लार्क वेनिटॉक्सने स्वतःला गिळणाऱ्या आपल्या या सापाचा व्हिडीओ शूट केला. सापाला असं करण्यापासून रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या तोंडावर तो काहीतरी शिंपडताना दिसतो. त्यानंतर साप लगेच आपल्या तोंडात घेतलेलं आपलं शरीर बाहेर टाकतो. तेव्हा जे दिसतं ते पाहून थक्कच व्हायरल होतं. या सापाने जवळपास आपलं निम्मं शरीर गिळलंच होतं. त्यामुळे त्याचा आकार गोलाकार झाला होता. तो स्वतःला आणखी गिळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचं शेपटीपासूनचं शरीर संपूर्ण शरीरात अडकलं होतं. पुढे जागात उरली नव्हती.

" isDesktop="true" id="647773" >

या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने त्या सापावर हँड सॅनिटाइझर शिंपडलं. सापाला हँड सॅनिटायझरची चव बिलकुल आवडत नाही. जसं या व्यक्तीने सापावर सॅनिटायझर लावलं तसं त्याने आपलं शरीर तोंडातून बाहेर फेकलं.

हे वाचा - VIDEO - बापरे बाप! महिलेने केसांमध्ये रबरऐवजी गुंडाळला चक्क जिवंत साप आणि...

या व्यक्तीने चुकून हँड सॅनिटाझर सापाच्या डोक्याऐवजी डोळ्यांवर शिंपडलं, त्यामुळे साप इतका आक्रमक झाला. पण सापाचे क्लिअर स्केल्स चांगले असतात जे त्यांच्या डोळ्यांचं संरक्षण करतात. त्यामुळे त्याच्या डोळ्यांवर सॅनिटायझरचा तसा काही दुष्परिणाम झाला नाही हे त्याने स्पष्ट केलं. तसंच या सापाला नंतर धुतलं आणि आता तो बिलकुल ठिक असल्याचंही त्याने सांगितलं.

हे वाचा - जगरासोबत मस्ती पडली महागात; पुढच्याच क्षणी तरुणाची भयंकर अवस्था, Shocking Video

सापाने स्वतःलाच का गिळलं यामागील कारण सांगताना या व्यक्तीने सांगितलं, किंगस्नेक असं स्वतःसोबत करतो कारण तो दुसऱ्या सापांना खातो. तणाव, भूक किंवा जास्त गरम तापमान यामुळे हे झालं असावं असं काही लोक म्हणतात. कदाचित तसंही असू शकतं.

First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos