Home /News /viral /

पकडायला आलेल्या तरुणावर चवताळला भलामोठा कोब्रा अन्...; थरकाप उडवणारा VIDEO

पकडायला आलेल्या तरुणावर चवताळला भलामोठा कोब्रा अन्...; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मोठ्या कोब्राला पकडण्यासाठी एक व्यक्ती प्रयत्न करत आहे. यादरम्यान रागात साप या व्यक्तीवरच हल्ला करतो

    नवी दिल्ली 04 डिसेंबर : किंग कोब्रा (King Cobra Snake) हा जगातील सर्वाधित भयानक साप मानला जातो. कोबरा समोर येताच मोठमोठ्यांना घाम फुटतो. चुकूनही हा साप समोर दिसल्यास माणसं आपल्या रस्ताच बदलतात. इतकंच नाही तर सर्प मित्रही याला पकडताना अतिशय खबरदारी घेतात. किंग कोब्रा हा एक असा साप आहे, जो मृत्यूनंतरही माणसासाठी घातक असतो. दंश करून हा साप काही वेळेतच माणसाचा जीवही घेऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला किंग कोब्राचा असाच एक व्हिडिओ (Viral Video of Cobra) दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये एक सर्पमित्र या कोब्राला पकडताना दिसतो. मात्र मध्येच असं काही घडतं की सर्पमित्रही घाबरतो. हा कोबरा सर्पमित्रावरच हल्ला (Cobra Attack) करतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की कोब्राला पकडणं म्हणजे स्वतःचाही जीव धोक्यात टाकणं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मोठ्या कोब्राला पकडण्यासाठी एक व्यक्ती प्रयत्न करत आहे. यादरम्यान रागात साप या व्यक्तीवरच हल्ला करतो. मात्र हा व्यक्तीही जिद्दी असतो. तो वारंवार कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करतो. यानंतर कोब्रा या व्यक्तीवर पुन्हा एकदा हल्ला करतो. यावेळी हा व्यक्ती सापाच्या तावडीतून अगदी थोडक्यात वाचतो. यानंतर अनेक लोक या व्यक्तीच्या मदतीसाठी येतात आणि अखेर सापाला पकडतात. हा व्हिडिओ Animal_World नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, हे समोर आलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: King cobra, Shocking video viral

    पुढील बातम्या