मुंबई : सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. कारण सापाच्या विषात माणसाचं आयुष्य संपवण्याची ताकद असते. काही सापांच्या जाती तर इतके धक्कादायक असतात की त्याच्या दंशामुळे माणसाचा क्षणात मृत्यू होतो. म्हणून तर लोक त्याच्यापासून लांब पळतात. पण या सगळ्यात एका तरुणाने काही भलतंच साहस केलं आहे, जे पाहून लोकांना धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर तुम्ही सापांशी संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये सापाने कधी कोणावर हल्ला केल्याचे दृश्य असते, तर कधी सापाच्या विचित्र वागण्याचे दृश्य असते. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थोडा वेगळा आहे.
Viral Video : किंग कोब्राशी खेळ म्हणजे मृत्यूला आमंत्रण, तरुणाने सापाची शेपटी पकडली आणि...
या व्हिडीओत एक तरुण भल्यामोठ्या किंग कोब्राला पाण्याने अंघोळ घालताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भीतीऐवजी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. आठ फूट लांबीचा हा साप फणा पसरवून अगदी आरामात बसला आहे, हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यादरम्यान एक व्यक्ती बादलीत पाणी घेऊन त्याला आंघोळ घालताना दिसत आहे. दरम्यान, साप लहान मुलाप्रमाणे आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. पुढे व्हिडीओमध्ये ती व्यक्ती सापाच्या फणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सध्या उन्हाळा असल्यामुळे साप किंवा इतर प्राणी पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रासलेले असतात. शिवाय त्यांना थंडावा मिळावा याच्या शोधात हे प्राणी असतात. अशात या तरुणाने सापाला पाण्याने अंघोळ घालून अगदी शांत केलं आहे. ज्यामुळे हा साप देखील फारच आनंदी दिसत आहे.
A man in India shows kindness to a king cobra by cooling it off on a hot sunny day. pic.twitter.com/WckNvnZN2V
— Tansu YEĞEN (@TansuYegen) March 28, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TansuYegen या हँडलने शेअर करण्यात आला आहे, जो खूप वेळा पाहिला जात आहे. तसेच लोकांनी याला खूप पसंत केलं आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट्स देखील करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: King cobra, Snake, Social media, Videos viral, Viral, Wild life