Home /News /viral /

अद्भुत! प्राणायम करताना दिसला King cobra; कधीच पाहिला नसेल असा Snake Yoga Video

अद्भुत! प्राणायम करताना दिसला King cobra; कधीच पाहिला नसेल असा Snake Yoga Video

सापाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

    मुंबई, 30 एप्रिल : सापाच्या हल्ल्याचे व्हिडीओ (Snake attack video) तुम्ही बरेच पाहिले असतील. पण कधी सापाला तुम्ही योगा (Snake yoga video) करताना पाहिलं आहे का? साप आणि योगा कसं शक्य आहे, असंच तुम्ही म्हणाल. पण अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा साधासुधा साप नाही तर चक्क एक किंग कोब्रा आहे. कोब्रा प्राणायम करताना दिसला आहे (King cobra pranayama video). योगामध्ये भुजंगासन नावाचं एक आसन आहे. ज्यात शरीराची स्थिती सापासारखी असते. पण प्रत्यक्षात सापही योगा करतो हे या व्हिडीओतूनच तुम्हाला पाहायला मिळेल. प्राणायाम करणारा हा कोब्रा पाहून तुम्ही थक्क व्हाल. प्राणायमामध्ये शरीर शांत स्थितीत असतं. त्यावेळी मोठ्याने श्वास शरीरात घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. हा कोब्राही एका ठिकाणी फणा काढून शांत बसला आहे आणि तोसुद्धा अशाच पद्धतीने श्वास आतबाहेर करतो आहे. त्याच्या शरीराची हालचाल तुम्ही पाहू शकता. त्याचं शरीर मध्ये फुलतं आणि मध्येच आकुंचन पावतं. हे वाचा - VIDEO - एकट्या कोब्रावर तुटून पडली मुंगूसांची गँग; विश्वास बसणार नाही असा लढाईचा The End मेघना गिरीश नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनीही रिट्विट केला आहे. मेघना गिरीश यांनी कॅप्शनमध्ये हा साप प्राणायम करतो आहे का? असा प्रश्न विचारला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत. साप नक्की काय करतो आहे, याबाबत प्रत्येकाने आपापली मतं मांडली आहेत. काहींनी याला प्राणायमच म्हटलं आहे. तर काहींनी याला तो शिकारीच्या स्थितीत किंवा आपल्याला शिकाऱ्यापासून धोका असताना तो हल्ल्याच्या स्थितीत असल्याचं सांगितलं आहे. हे वाचा - बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं. किंवा तुम्हाला याबाबत अधिक काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: King cobra, Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या