Home /News /viral /

पाण्यात पडलेल्या बाहुलीला वाचवायला चिमुरडीनेही मारली स्विमिंग पुलमध्ये उडी, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पाण्यात पडलेल्या बाहुलीला वाचवायला चिमुरडीनेही मारली स्विमिंग पुलमध्ये उडी, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Social Media Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटी, एक ते दीड वर्षांची मुलगी तुम्हाला दिसेल. ही मुलगी आपल्या बाहुलीला वाचवायला स्विमिंग पूलमध्ये उतरते आणि...

मुंबई, 25 जानेवारी: आजकाल सोशल मीडिया हे एक मोठं व्यासपीठ बनलं आहे. इथं व्यक्ती एका रात्रीतून स्टार बनू शकतो, एवढी ताकद या सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओज येत असतात. हे व्हिडीओज झपाट्यानं व्हायरलसुद्धा होतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आजकाल लहान मुलांचे बरेचसे व्हिडीओज (Viral Video on Social media) आपल्याला बघायला मिळतात. कोणाचे खेळताना, कोणाचे काही खाताना, तर कोणाचे नुसत्याच क्युट एक्स्प्रेशन्सचे हे व्हिडीओज असतात. अनेकदा हे व्हिडीओज अक्षरशः काही तासात जगभरात पसरतात. काही काही व्हिडीओज तुम्हाला थक्क करून सोडतात, तर काही व्हिडिओज तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. असाच एक लहान बाळाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटी, एक ते दीड वर्षांची मुलगी तुम्हाला दिसेल. ही मुलगी आपल्या बाहुलीला वाचवायला स्विमिंग पूलमध्ये उतरते आणि तिला घेऊन पोहत स्विमिंग पूलच्या बाहेर येताना आपल्याला दिसते. हा काही सेकंदांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान फिरतोय. एवढ्याशा मुलीची हुशारी आणि समज बघून सगळेच तिचं कौतुक करतायत. हे वाचा-हंसाला वाचवण्याासठी अनेक तास चाललं बचावकार्य; जवळून पाहताच शॉक झाली टीम नक्की काय आहे हा व्हिडिओ? तर या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी छोट्या स्विमिंग पूलजवळ बसलेली आहे. त्याच पूलमध्ये तिची बाहुली पडते. लगेच ही मुलगी पायऱ्यांवरून त्या पूलमध्ये उतरते तेव्हा पाहणाऱ्यांच्या मनाचा ठोका चुकतो कारण प्रत्येकालाच या मुलीच्या जीवाची चिंता असते. पण ही मुलगी आपल्या बाहुलीजवळ पोहोचते. बाहुलीला घेऊन ती पोहत स्विमिंग पूलच्या कठड्यापाशी येते आणि मग बाहेर येते. व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी साधारण एक ते दीड वर्षांची आहे. एवढ्याशा मुलीला असलेली ही समज पाहून लोक आश्चर्यचकित होताना दिसतायत. एवढंच नाही तर, या छोट्याशा मुलीला पोहायला येतंय हे पाहूनही लोक थक्क झालेत.
हा व्हिडीओ oceanfulldive नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडीओ बघून लोक प्रचंड खूश होतायत. काही मिनिटांतच हा व्हिडीओ कित्येक लोकांनी शेअर केला. या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स येताना दिसतायत. सगळेच जण या चिमुरडीच्या हुशारीचे कौतुक करताना दिसत आहेत.
First published:

Tags: Shocking video viral, Social media viral, Video viral

पुढील बातम्या