Home /News /viral /

OMG! चिमुकल्याने दाखवलं आपलं जबरदस्त टॅलेंट; फक्त VIDEO पाहूनच चक्कर येईल

OMG! चिमुकल्याने दाखवलं आपलं जबरदस्त टॅलेंट; फक्त VIDEO पाहूनच चक्कर येईल

मुलाचं बॅलेन्सिंग टॅलेंट पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत.

  मुंबई, 01 मे : वही, पट्टी किंवा एखादी दुसरी वस्तू डोक्यावर ठेवून चालण्याचा प्रयत्न तुम्ही कधी ना कधी केलाच असेल. डोक्यावर वस्तू ठेवून अगदी अलगद पाय टाकून चाललं तरी डोक्यावरील वस्तू धाडकन खाली कोसळते. असं बॅलेन्स करणं सोपं नाही. पण एका चिमुकल्याने मात्र हलत्या बोर्डवर असं बॅलेन्स करून दाखवलं आहे. त्याचं जबरदस्त टॅलेंट पाहून तुम्हाला चक्कर येईल (Kid amazing balancing amaze people video). हलत्या लाकडी बोर्ड बॅलेन्स करणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्याचा बॅलेन्स पाहून सर्वजण थक्क झाले आहे. इतका बॅलेन्स करणं कसं शक्य आहे, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे  (Kid balance glass bowl on moving board) . व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा स्टंट करताना दिसतो आहे. तो ओका लाकडी बोर्डवर उभा आहे. ज्याच्याखाली एक डबा आहे. म्हणजे या डब्यावर हा बोर्ड हलतो आहे. त्यावर या मुलाने आपला तोल सावरला आहे. हे वाचा - 'मी आलो नाही तर तुमची...', शालेय विद्यार्थ्याचं Funny Leave Application वाचून पोट धरून हसाल त्याच्या डोक्यावर काही काचेच्या वाट्या आहेत. यापैकी तीन वाट्या तो बोर्डवर आपला तोल सावरत सावरत हातात घेतो आणि बोर्डच्या एका बाजूला रांगेत लावतो. त्यानंतर एका बाजूने बोर्डवर जोर देत त्या वाट्या वर उडवतो. तिन्ही वाट्या हवेत उडतात तेव्हा हा मुलगा त्या बरोबर आपल्या डोक्यावर असेलल्या वाटीमध्ये झेलून घेतो. या तिन्ही वाट्या त्या वाटीत एकात एक पडतात.
  View this post on Instagram

  A post shared by Techzexpress (@techzexpress)

  टेकएक्सप्रेस (techzexpress) इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. हे वाचा - VIDEO - सायकलवर स्टंट करत होता लहान मुलगा; अचानक निघालं सायकलचं चाक आणि... मुलाच्या टॅलेंटचं सर्वांनी कौतुक केलं आहे. कुणी त्याला जिनीअस म्हटलं आहे, तर कुणी हा मोठा होऊन सर्फर बनणार असं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं. ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या