Home /News /viral /

खुर्चीला लाथ मारत रडत रडत सोडला मंडप; नवरदेवासोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

खुर्चीला लाथ मारत रडत रडत सोडला मंडप; नवरदेवासोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

लग्नात नवदेवाच्या डोळ्यातून अश्रू येताना आणि चेहऱ्यावर रागही दिसून आला.

  मुंबई, 19 मे : लग्न म्हटलं की त्या मजामस्ती, आनंदासह काही भावुक क्षणही असतात. कधी नवरीबाई तर कधी नवरदेव, तर कधी त्यांचे नातेवाईक इमोशनल होतात (Wedding video). सध्या सोशल मीडियावरही अशाच इमोशनल झालेल्या एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण भावुक होण्यासह या नवरदेवाच्या रागाचाही पारा चढला आहे. भरमंडपात तमाशा करून त्याने मंडप सोडला आहे (Groom crying in wedding). लग्नाचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. नवरदेव भरमंडपातच सर्वांसमोर रडू लागला. रडण्यासह तो भडकलेलाही आहे. याच रागात त्याने खुर्चीलाही लाथ मारली. रडत, रागात त्याने मंडप सोडला आहे. तो मंडपातून बाहेर पडला आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला गळ्यात वरमाला आणि डोक्यावर फेटा बांधलेला सुटाबुटातील नवरदेव स्टेजवर दिसतो. त्याच्या आजूबाजूला काही तरुणही आहेत. नवरदेवाचे डोळे पाण्याने भरलेले आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो आपल्या हाताने डोळे पुसतो. रडता रडता तो चालतो त्याच्यामागे एक तरुणही हातात फुलं घेऊन धावताना दिसतो. पण नवरदेव त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे वाचा - Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू' नवरदेवाच्या चेहऱ्यावर दुःखासह रागही दिसतो. तो कोणत्यातरी गोष्टीमुळे भडकला आहे. रडत रडत, डोळे पुसत तो पुढे जातो तेव्हा त्याच्या समोर एक खुर्ची येते. त्या खुर्चीला तो आपल्या पायांनी ढकलतो. जोरात लाथ मारून ती खुर्ची पाडतो. या पूर्ण व्हिडीओत नवरीबाई कुठेच दिसत नाही आहे.
  निरंजन महापात्रा नावाच्या सोशल मीडिया युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी या नवरदेवाची खिल्लीही उडवली आहे. काही जणांनी याला लहान मुलगा म्हटलं आहे. हे वाचा - अजब प्रथा! लेक तरुण होताच बापच होतो नवरा; जिला अंगाखांद्यावर खेळवतात त्याच मुलीसोबत वडील थाटतात संसार हा व्हिडीओ कुठला आणि कधीच आहे? या नवरदेवाने नेमकं असं का केलं? त्याच्यासोबत काही घडलं का?  की हा एखादा प्रँक आहे? हे काहीच माहिती नाही आहे. हा व्हिडीओ पाहून नेमकं या नवरदेवासोबत असं काय घडलं असावं, असं तुम्हाला वाटतं? तर ते आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या