मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पुरेशी साधनं नसताना तरुणी चालवते युट्युब चॅनेल; कमाईतून उभारलं स्वतःचं घर

पुरेशी साधनं नसताना तरुणी चालवते युट्युब चॅनेल; कमाईतून उभारलं स्वतःचं घर

एक युवती सध्या तिच्या युट्युब चॅनेलमुळे (Youtube Channel) जोरदार चर्चेत आहे. या माध्यमातून तिला चांगली कमाई होत आहे. या कमाईतून तिने घराचे स्वप्न साकार केले असून, तिचे हे ड्रिम होम (Dream Home) देखील चर्चेचा विषय ठरले आहे.

एक युवती सध्या तिच्या युट्युब चॅनेलमुळे (Youtube Channel) जोरदार चर्चेत आहे. या माध्यमातून तिला चांगली कमाई होत आहे. या कमाईतून तिने घराचे स्वप्न साकार केले असून, तिचे हे ड्रिम होम (Dream Home) देखील चर्चेचा विषय ठरले आहे.

एक युवती सध्या तिच्या युट्युब चॅनेलमुळे (Youtube Channel) जोरदार चर्चेत आहे. या माध्यमातून तिला चांगली कमाई होत आहे. या कमाईतून तिने घराचे स्वप्न साकार केले असून, तिचे हे ड्रिम होम (Dream Home) देखील चर्चेचा विषय ठरले आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 5 जून: सध्या युट्युब, इन्स्टाग्राम सारखी माध्यमं ही संवाद साधणं, कनेक्ट राहणं त्याचबरोबर कमाईचे देखील साधन झाले आहे. व्हिडिओ, फोटोज या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचून त्यातून अर्थार्जन होऊ शकते. त्यामुळे आजची युवा पिढी या माध्यमाकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) अशीच एक युवती सध्या तिच्या युट्युब चॅनेलमुळे (Youtube Channel) जोरदार चर्चेत आहे. या माध्यमातून तिला चांगली कमाई होत आहे. या कमाईतून तिने घराचे स्वप्न साकार केले असून, तिचे हे ड्रिम होम (Dream Home) देखील चर्चेचा विषय ठरले आहे.

पाकिस्तान सारख्या देशातील ग्रामीण भागात वीज पुरवठा असून नसल्यासारखा असतो. ना वीज येण्याची वेळ निश्चित ना जाण्याची. अशा स्थिती या भागांमध्ये इंटरनेटवर भरोसा ठेवणं म्हणजे दिवा स्वप्नच म्हणावे लागेल. मात्र ग्रामीण भागातील राबिया नाज शेख (Rabia Naaz Shekh)  नावाच्या एका मुलीने घरबसल्या रोजगाराची संधी शोधून काढली आहे. तिने स्वताचा युट्युब चॅनेल सुरु केला आहे. या चॅनेलसाठी राबिया रोज एक तरी व्हिडिओ शूट करुन तो अपलोड करते.

‘शेम शेम शेम...’ लहान मुलांसमोर लेस्बियन कपलनं केले चाळे; व्हिडीओ व्हायरल

सिंधमधील खैरपूर भागातील राहूजा सारख्या छोट्याशा गावात राहणारी 25 वर्षीय राबियाने एक वर्षापूर्वी युट्युब चॅनेल सुरु केला. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फॅशन अॅडिक्शन (Fashion Addiction) नावाच्या या चॅनेलचे सध्या 1 लाख 60 हजार सबस्क्रायबर (Subscriber) आहेत. हा चॅनेल राबिया एकटी चालवते.

12 वी पर्यंत शिकलेल्या राबियाने छंदातून मिळवली श्रीमंती

राबियाचे शिक्षण केवळ इयत्ता 12 वीपर्यंत झाले आहे. बीबीसीशी बोलताना राबियाने सांगितले की मी माझ्या मर्जीनं शिक्षण सोडलं आहे. मला युट्युबची आवड होती, त्यामुळे त्यावर चॅनेल सुरु करण्याचा विचार माझ्या मनात आला. मी बहुतांश गोष्टी या इंटरनेटवर बघून शिकली आहे. माझ्या भावांनी मला एडिटींग शिकवलं आणि बाकी सर्व गोष्टी मी माझी शिकले. शिवणकाम शिकल्यानंतर मी इंटरनेटवर विविध प्रकारची डिझाईन्स पाहत असे. या आवडीमुळे मी फॅशन इंडस्ट्रीशी (Fashion Industry) जोडली गेले आणि त्यातूनच फॅशन अॅडिक्शन नावाचं युट्युब चॅनेल मी सुरु केल्याचं राबियानं सांगितलं.

बापरे! तब्बल 120 वर्षांपासून सलग जळतोय हा बल्ब, वाचा त्याच्या दीर्घायुष्याची अनोखी कथा

सर्व कामे ती एकटीच करते

बीबीसीशी बोलताना राबियानं सांगितलं की मी फॅशन आणि ट्रेंडमध्ये सुरु असलेल्या घडामोडी सातत्याने पाहत असते. कपड्यांची कटींग आणि त्याचे शिवणकाम बघून मी व्हिडीओसाठी कंटेट तयार करते. यात सर्वप्रथम विविध वेबसाईटवरुन फोटो जमा करते. त्यानंतर त्यावर आधारित स्क्रिप्ट लिहीते आणि व्हॉईस ओव्हर देते. एडिटींग सॉफ्टवेअरच्या मदतीनं एडीट करुन व्हिडिओ अपलोड करते. यासाठी मला दोन ते अडीच तास लागतात. आश्चर्याची बाब म्हणजे राबिया हे सर्व काम स्मार्टफोनच्या माध्यमातून करते.

महिन्याला 40 ते 50 हजार रुपये मिळतात

राबियाने सांगितले की चॅनेल मोनोटाईज करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. आता मला एका महिन्यात 40 ते 50 रुपये मिळतात. या पैशातून मी माझ्यासाठी दोन खोल्यांचे घर बांधत आहे. या घराचे काम अद्याप सुरु असून ते या वर्षभरात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. स्वःतासाठी घर बांधणारी मी माझ्या गावातील पहिली मुलगी आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे रात्रभर स्मार्टफोन चार्ज करावा लागतो. तेव्हा कुठे मी सकाळी त्यावर काम करु शकते. जेव्हा इंटरनेटला (Internet) चांगला स्पीड असतो, तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असल्याचे राबियाने सांगितले.

First published:

Tags: Startup Success Story, Success story, Youtube, YouTube Channel