नवी दिल्ली, 26 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या घटना पहायला मिळतात. काही व्यक्तींचे वादग्रस्त किंवा विचित्र वक्तव्यदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही खळबळ पहायला मिळते. अशातच 24 वर्षीय मुलाच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सेबॉस्टियन ग्योर्क हा 24 वर्षीय अमेरिकेतील रहिवासी आहे. अवघ्या सहा वर्षात त्याने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे 65 कोटींहून अधिक कमाई केली. डेलीस्टार एजन्सीच्या मते, सेबॅस्टियनने घरांची खरेदी-विक्री करुन आणि यूट्यूबच्या माध्यमातून एवढी कमाई केली. त्याचे युट्यूबवर 6 लाखांपैक्षा जास्त सब्स्क्राइबर्स आहेत. याशिवाय तो ड्रॉपशिपिंग कंपन्यांच्या माध्यमांतूनही पैसा कमावतो. सेबॅस्टियनने अलिकडेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यानंतर तो वादात सापडला.
हेही वाचा - बॉलिवूडच्या 'अण्णा'चा डुब्लीकेट सापडला, video होतोय तुफान व्हायरल
पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, सर्व पुरुषांनी लॅम्बॉर्गिनी कार खरेदी करणं आवश्यक आहे. जर तुमचे वय 20 ते 25 च्या दरम्यान आहे तर तुमच्याकडे लॅम्बॉर्गिनी कार असायलाच हवी. जर नसेल तर तुम्ही एकट्यात बसून स्वतःला विचारा तुमच्याकडे लॅम्बॉर्गिनी का नाही? त्याचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून यामुळे तो चर्चेत आला आहे.
सेबॅस्टियनने गेल्या वर्षी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये त्याने त्याच्या करिअरविषयी सांगितलं होतं. त्यानं सांगितलं होतं, तो हायस्कूलमध्ये असताना kfc आणि Tacobell सारख्या ठिकाणी काम करत होता. येथे काम करताना त्याला 700 रुपये मिळत होते. त्याने कारदेखील साफ केल्या आहेत. त्याने असा दावाही केला की, तो 19 वर्षाचा होता तेव्हा त्याच्याकडे 65 लाखांपेक्षा अधिक संपत्ती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Viral, Viral news