तिरुवअनंतपुरम 17 जानेवारी : कोणाचं नशीब कधी आणि कसं पलटेल, हे कोणीच सांगू शकत नाही. केरळमधील सदानंद यांच्याबाबतीतही अगदी असंच झालं. सदानंद यांनी ख्रिस्मस आणि न्यू ईअरचं बंपर लॉटरी तिकिट (Bumper Lottery Ticket) खरेदी केलं आणि याच लॉटरीने त्यांचं नशीबच पालटलं. अवघ्या काहीच तासांत ते 12 कोटी रुपयांचे मालक झाले (Man Wins 12 Crore Lottery). सकाळी चिकन खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना त्यांनी हे तिकिट खरेदी केलं. दुपारी जेव्हा याचा निकाल लागला तेव्हा समजलं की सदानंद यांनी घेतलेल्या तिकिटामुळे त्यांनी 12 कोटी रुपये जिंकले आहेत.
या शाळेनं हुशार विद्यार्थ्यांना दिलं अतिशय अजब बक्षीस; वाचूनच व्हाल अवाक
सदानंद हे केरळच्या कोट्टायम येथील कुडयामपडी इथले रहिवासी आहेत. त्यांनी जिंकलेल्या तिकिटाचा नंबर XG 218582 असा होता. सदानंद आणि त्यांचं कुटुंब कुडयामपडी येथे एका छोट्याशा घरामध्ये राहतात. गेल्या 50 वर्षांपासून ते पेंटर म्हणून काम करतात.
सदानंद यांनी सांगितलं की त्यांच्यावर भरपूर कर्ज आहे आणि आपल्या मुलांसाठी त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. कोट्टायम येथील बेंझ लॉटरी एजन्सीने हे तिकिट विकले होते. कोट्टायम येथील लॉटरी एजंट बीजी वर्गीस यांनी विकलेले हे तिकीट सदानंद यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं.
दुसरे बक्षीस सहा व्यक्तींसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये (एकूण 3 कोटी रुपये) होतं. 10 लाख रुपयांचे तिसरं बक्षीस सहा जणांना तर 5 लाख रुपयांचं चौथं बक्षीस सहा जणांना देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, 5000, 3000, 2000 आणि 1000 सारखी इतर अनेक बक्षिसं आहेत. XA, XB, XC, XD, XE आणि XG या पाच मालिकांमध्ये तिकिटे जारी करण्यात आली आहेत. लॉटरी विभागाने सात लाखांहून अधिक तिकिटे छापली आहेत. लॉटरी विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतांश तिकिटे विकली गेली आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.