Home /News /viral /

गाणं ऐकताच Lady IAS Officer झाली सैराट, कॉलेज विद्यार्थ्यांसोबत घातला जबरदस्त धिंगाणा; पाहा VIDEO

गाणं ऐकताच Lady IAS Officer झाली सैराट, कॉलेज विद्यार्थ्यांसोबत घातला जबरदस्त धिंगाणा; पाहा VIDEO

केरळच्या आयएएस ऑफिसर डॉ. दिव्या एस. अय्यर यांचं एक हटके आणि अनोखं रूप पाहायला मिळालं.

    तिरुवनंतपुरम, 02 एप्रिल : IAS-IPS अधिकारी म्हटलं की एक अभ्यासू, शिस्तप्रिय, कठोर अशी व्यक्ती समोर येते. पण सध्या अशा आयएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या महिला आयएएस अधिकाऱ्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या अधिकाऱ्याने कॉलेज विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले आहेत (Kerala IAS officer Divya Iyer dance). केरळमधील पथानमथित्ता जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर यांचं एक हटके आणि अनोखं रूप पाहायला मिळालं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आला आहे. त्यांनी चक्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोबत डान्स केला आहे. एमजीयू युनिव्हर्सिटीच्या यूथफेस्टमध्ये त्या सहभागी झाल्या. तिथं काही विद्यार्थी डान्स करत होते. दीपिका पादुकोणचं नगाडे संग ढोल बाजे गाणं वाजत होतं. गाणं ऐकून आणि मुलांना डान्स करताना पाहून डॉ. दिव्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. त्यासुद्धा विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकल्या. व्हिडीओत पाहू शकता डॉ. दिव्या अगदी बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. डान्सची मजा त्या लुटत आहेत. आपण जिल्हाधिकारी आहोत हे विसरून त्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येच एकरूप झाल्या आहेत आणि त्यांच्यासोबत डान्सच्या स्टेप्स करताना दिसत आहेत.  यावेळी त्यांची मुलं आणि त्यांचे पतीही तिथं उपस्थित होते, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा - VIDEO - टीव्हीत वाघाला पाहताच जीव वाचवण्याची धडपड; तरुणाने उचललं खतरनाक पाऊल डॉ. दिव्या म्हणाल्या, 'अनेक लोकांनी मला हा डान्स करताना संकोच वाटला नाही का असं विचारलं. पण संकोच वाटण्यासारखं काय आहे?. मला माझ्या कॉलेज युथफेस्टची आठवण झाली'
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Ias officer, Kerala, Viral, Viral videos

    पुढील बातम्या