नळातून पाणी नाही आली दारू, लोकांना सुचेना काय करावं; वाचा केरळमध्ये नेमकं काय घडलं?

नळातून पाणी नाही आली दारू, लोकांना सुचेना काय करावं; वाचा केरळमध्ये नेमकं काय घडलं?

एक नाही तर तब्बल 18 घरांमध्ये नळातून पाणी ऐवजी दारू येत असल्याचं स्पष्ट झालं.

  • Share this:

केरळ,06 फेब्रुवारी : तळीरामांसाठी दारू सकाळी काय आणि रात्री काय, त्याच्यासाठी दिवाळी अन् दसारा एकाच दिवशी आल्यासारखं आहे. परंतु, केरळ (Kerala) मधील त्रिसूर जिल्ह्यात (Thrissur district) मधील सोलमन एव्हॅन्यूमधील सोसायटीत नळाला पाणी ऐवजी अचानक  दारू यायला लागली होती.

आता नळाला दारू यायला लागली म्हटल्यावर एकच गोंधळ उडाला. शेजारी ऐकमेकांकडे 'तुमच्याही नळाला दारू आली का?' असा प्रश्न विचारू लागले. तब्बल 18 घरांमध्ये नळातून पाणी ऐवजी दारू येत असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाचा हाहाकार उडाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं.

टाइम्स ऑफ इंडिया आणि एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या टीमने तब्बल 4500 लीटर दारू जप्त केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यानंतर ही दारू कुठे नष्ट करावी असा प्रश्न उभा ठाकला होता. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या टीमने एक भल्ला मोठा खड्डा खोदून त्यामध्ये ही दारू फेकून दिली होती. पण याबद्दल त्यांनी बिल्कुल अंदाजा नव्हता की, ही दारू तिथून वाहत जाऊन जवळच असलेल्या एका विहिरीत मिळाली. याच विहिरीतून सोलमन एव्हॅन्यू सोसायटीच्या लोकांना पाणी पुरवठा कऱण्याचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे झालं असं की, लोकांच्या नळाला पाणी ऐवजी थेट दारूच यायला लागली.

या सोसायटीमध्ये राहणाऱ्या जोशी मालियेकल नावाच्या व्यक्तीला हा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला. घरातील नळ चालू केला असता अचानक पाणी ऐवजी तांबड्या रंगाचे पाणी यायला लागले असे निदर्शनास आहे. आधी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमध्ये बिघाड झाला असं वाटलं. पण, जेव्हा पाणी प्यायलं तेव्हा ते पाणी दारू असल्याचं समजलं.

जोशी यांनी चालुकडी पालिका अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली आणि संपूर्ण हकिकत सांगितली. त्यानंतर या सर्व 18 कुटुंबांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला. तसंच जोपर्यंत विहिरीतून दारू मिश्रीत पाणी काढले जात नाही, तोपर्यंत पालिकेकडून स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असं आश्वासन देण्यात आलं.

वॉर्ड अधिकारी वी.जेय जोजी यांनी सांगितलं की, 'या कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून दुषित पाणी पुरवठा होत होता. आता त्यांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल.'

तर उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त टीके सानू यांनी झालेल्या प्रकारवर खुलासा केला आहे. आमच्या कारवाईमुळे असं काही घडले, याबद्दल कल्पना नव्हती. ज्या विहिरीमध्ये दारू मिसळले गेले, त्या विहिरीला आतापर्यंत आठ वेळा साफ करण्यात आलं आहे. हे तोपर्यंत साफ केलं जाईल जोपर्यंत पाण्याला दारूचा वास येणार नाही. लवकरच या लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. या सोसायटीतील लहान मुलं आणि वृद्धांसह सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

First published: February 6, 2020, 9:26 PM IST

ताज्या बातम्या