मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल

OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल

64 वर्षांच्या आजोबांचा जोश आणि टॅलेंट पाहून समोर उभा तरुणही थक्क झाला.

64 वर्षांच्या आजोबांचा जोश आणि टॅलेंट पाहून समोर उभा तरुणही थक्क झाला.

64 वर्षांच्या आजोबांचा जोश आणि टॅलेंट पाहून समोर उभा तरुणही थक्क झाला.

  • Published by:  Priya Lad
तिरुवनंतपुरम, 02 ऑगस्ट : जसजसं वय वाढत जातं तसतसं अनेक लोक आता आपण पिकलं पान आपल्याने काही होणार नाही, असं म्हणतात (Old man video viral). पण काही लोक असे असतात ज्यांचं वय म्हणजे फक्त आकडा असतो. त्यांच्यात जोश इतका असतो की तरुणांनाही लाज वाटेल. अशाच एका वृद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका तरुणासमोरच 64 वर्षांच्या आजोबांनी लुंगीवर असं काही करून दाखवलं की तो तरुणही शॉक झाला. प्रदीप नावाचा एक फ्रीस्टाइल फूटबॉल प्लेअर आहे (Freestyle football video). जो फुटबॉलसोबत काही ना काही स्टंट दाखवतो. नुकतंच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो फुटबॉल खेळताना दिसतो. त्याच्यासमोर एक वयस्कर व्यक्ती लुंगी घालून उभी आहे. ही व्यक्ती प्रदीपसमोर असं काही करतब करून दाखवते की तोसुद्धा पाहतच राहतो (Old man playing football in lungi video). व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला प्रदीप आपल्या फुटबॉलचं स्किल दाखवताना दिसतो. त्याच्यासमोर असलेले आजोबा त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत असतात. काही वेळाने प्रदीप आपल्याजवळील फुटबॉल काही वेळाने त्या आजोबांकडे देतो. आता आजोबा या फुटबॉलसोबत काय करणार असंच तुम्हाला वाटेल. प्रदीपलाही तसंच वाटतं. पण आजोबा पुढे जे करतात ते पाहून प्रदीपही थक्क होतो (64 year old man playing football). हे वाचा - लग्नाच्या आनंदात भररस्त्यातच तरुणाचं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स आजोबा फुटबॉल खेळू लागतात. आश्चर्य म्हणजे ते लुंगी घालून फ्रीस्टाईल फुटबॉल खेळतात. फुटबॉलसोबत ते असं करतब करून दाखवतात की प्रदीपही शॉक होतो. व्हिडीओ पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
प्रदीपने हा व्हिडीओ पोस्ट करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचं वय 64 वर्षे आहे. ते ट्रक चालवतात पण त्यांना फुटबॉल खेळण्याचीही आवड आहे. त्यामुळे ते ट्रकमध्ये आपल्यासोबत फुटबॉल किट घेऊनच जातात. ते वायनाड फुटबॉल टीमचे मेंबरही होते. या वयातही त्यांना फुटबॉल खेळण्याची हौस आहे. हे वाचा - शाळा सुरू होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा Video; असं काय आहे यात तुम्हीच पाहा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आजोबांचं टॅलेंट पाहून सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आहे. कुणी त्यांना कूल आजोबा म्हटलं आहे. तर कुणी लेजेंड. हे आजोबा म्हणजे आपल्यासाठी एक प्रेरणाच असल्याची प्रतिक्रियाही एका युझरने दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या