VIDEO : मुलीला बॅकसीटवर बसवून तरुणाची हिरोगिरी, बसला ओव्हरटेक करायला गेला आणि...

VIDEO : मुलीला बॅकसीटवर बसवून तरुणाची हिरोगिरी, बसला ओव्हरटेक करायला गेला आणि...

दुचाकीस्वारानं केलं ओव्हरटेक आणि बस चालकाला आला राग, पुढे काय झालं पाहा VIDEO

  • Share this:

बंगळुरू, 1 फेब्रुवारी: विना हेल्मेट बाईकवरून बसला ओव्हरटेक केल्याचा राग बस चालकाला आला आणि त्यानं भर रस्त्यात चक्क बस थांबवून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वारासोबत यावेळी तरुणीही होती. तिला दुचाकीवरून उतरवण्यात आलं आणि चालकाला बेदम चोप दिला. हा सगळ्या प्रकार शुक्रवारी सकाळी कर्नाटकातील बंगळुरू इथे घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मारहाण करणारा बस चालक बेंगलुरु मेट्रोपोलिटन ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनच्या वोल्वो बसचा चालक असल्याची माहिती मिळत आहे.

बस क्रमांक KA57 F822 जी रूट 500 डी (सेंट्रल सिल्क बोर्ड-हेब्बल) कडे जात होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारानं हेल्मेट न घालता ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या दुचाकीस्वारासोबत बाईकवर तरुणीही बसलेली होती. त्यावेळी बस चालकानं या तरुणाला रागाच्या भरात रोखलं. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच रागात तरुणीसमोर त्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हमीद नावाच्या एका व्यक्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये झालेला वाद आणि मारहाण दिसत आहे.

या व्हिडिओला 400 हून अधिक लाईक्स, सहाशेहून अधिक कमेंट्स आणि शेअर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तर अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा अधिकार या बस चालकाला कोणी दिला? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा-VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी

हेही वाचा-काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात

First published: February 1, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या