पोलिस अधिकाऱ्याचा फोटो होतोय व्हायरल, युझर म्हणाले ‘तूच खरा सिंघम!’

पोलिस अधिकाऱ्याचा फोटो होतोय व्हायरल, युझर म्हणाले ‘तूच खरा सिंघम!’

नव्या सिंघमचा फोटो पाहून तुम्ही अजय देवगणलाही विसराल.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर : सिंघम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो अजय देवगण. त्याचप्रमाणे सिंघम चित्रपटातील डॅशिंग पोलिस अधिकारी. मात्र वास्तवात खुप कमी वेळा असे पोलिस अधिकारी पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर सध्या एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तुच खरा सिंघम!

ट्विटरवर व्हायरल होत असलेला फोटो हा बंगळुरू येथील पोलिस अधिकाऱ्याचा आहे. या फोटोमध्ये हा पोलिस अधिकारी रिक्षा चालकाला मदत करताना दिसत आहे. हा अधिकारी चक्क आपल्या हातानं रिक्षा पुढे ढकलत आहे. बेंगळुरू पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी हा फोटो ट्वीट केला होता.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये हा पोलिस अधिकारी रिक्षा चालकाला मदत करताना दिसत आहे. बंगळुरू पोलिसांनी ट्वीट करत, “रिक्षा चालकाची रिक्षा अचानक बंद पडल्यामुळे त्याला पोलिस अधिकाऱ्यानं मदत केली”, असे सांगितले. दरम्यान, या पोलिस अधिकाऱ्याचे नाव अद्याप कळलेले नाही.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर युझरनं ‘तूच खरा सिंघम’, असे म्हणाले आहेत. तर, काही युझरनी ‘खुप छान काम बंगळुरू पोलिस’, असे म्हणत प्रशंसा केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 5, 2019, 6:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading