मराठी बातम्या /बातम्या /Viral /काँग्रेस नेत्याला संताप अनावर; भररस्त्यात कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, Video Viral

काँग्रेस नेत्याला संताप अनावर; भररस्त्यात कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, Video Viral

काँग्रेस नेत्याने याआधीदेखील अशा प्रकारचा गैरव्यवहार केल्याचे व्हिडीओ आहेत.

काँग्रेस नेत्याने याआधीदेखील अशा प्रकारचा गैरव्यवहार केल्याचे व्हिडीओ आहेत.

काँग्रेस नेत्याने याआधीदेखील अशा प्रकारचा गैरव्यवहार केल्याचे व्हिडीओ आहेत.

कर्नाटक, 10 जुलै : कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार (Karnataka Congress chief DK Shivkumar) यांनी सोबत चालणाऱ्या समर्थकाला कानशिलात लगानल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर नागरिकांनी शिवकुमार यांना अहंकारी असल्याचा ठपका ठेवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवकुमार वयोवृद्ध नेता आणि माजी मंत्री जी. मेडेगौडा यांना भेट देण्यासाठी मांड्याच्या दौऱ्यावर आले होते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती शिवकुमार यांच्या जवळून चालत आहे. यादरम्यान त्याचा हात शिवकुमार लागतो. यामुळे काँग्रेस नेते शिवकुमार चिडतात आणि त्यांनी समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे. शिवकुमार यांना जेव्हा कळालं की, तेथे मीडिया उपस्थित आहे, त्यांनी व्हिडीओ डिलिट करण्याचा आग्रह केला. (Congress leader angrily slapped activist, Video goes Viral)

हे ही वाचा-OMG! मोदींच्या 24 मंत्र्यांविरोधात हत्येचा गुन्हा, 90% मंत्री आहेत कोट्यधीश

शिवकुमार पुढे म्हणाले की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यामुळे त्यांना राग आला होता. ही पहिली वेळ नाही की ज्यात शिवकुमार त्यांनी समोरच्यासोबत गैरव्यवहार केला.  2018 मध्ये बेल्लारीमध्ये काँग्रेस निवडणूक प्रचारादरम्यान एक अन्य व्यक्तीच्या हातावर मारलं. ही व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी घेऊ इच्छित होता. 2017 मध्येही असाच एक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार माध्यमांसमोर घडला होता. काँग्रेस नेत्याने सांगितलं की, सेल्फी घेण्याची गरज होती. त्यामुळे माझी प्रतिक्रिया सर्वसामान्य असल्याचं सांगितलं.

First published:

Tags: Congress, Karnataka, Video viral