मराठी बातम्या /बातम्या /Viral /नडला त्याला भिडला! कांगारूला दगड मारत होता तरुण; काय झालं पाहा VIDEO

नडला त्याला भिडला! कांगारूला दगड मारत होता तरुण; काय झालं पाहा VIDEO

या कांगारूला तिथून हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र ते जागा सोडत नसल्यानं अखेर त्यांनी दगड मारून उठवण्याचा निर्णय घेतला आणि काय घडलं पाहा VIDEO

या कांगारूला तिथून हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र ते जागा सोडत नसल्यानं अखेर त्यांनी दगड मारून उठवण्याचा निर्णय घेतला आणि काय घडलं पाहा VIDEO

या कांगारूला तिथून हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र ते जागा सोडत नसल्यानं अखेर त्यांनी दगड मारून उठवण्याचा निर्णय घेतला आणि काय घडलं पाहा VIDEO

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : प्राण्यांना विनाकारण त्रास द्यायला गेलं की ते सहाजिकच अंगावर येतात बऱ्याचदा ते घाबरून पळून जातात किंवा प्राणघातक हल्ला करतात. अनेकदा मजेशीर घटना यावेळी घडत असतात. बऱ्याचदा कुत्रा किंवा मांजर अगदी अस्वलाला देखील त्रास दिल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण आता सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीनं कांगारूच्या पिल्लाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती कांगारूला दगड मारताना दिसत आहे. हे कांगारू चिडतं आणि त्या माणसावर हल्ला करतं. दोन्ही पायांनी त्या माणसाला ढकलून देतं. नडला त्याला भिडला असा या कांगारूचा आक्रमकपणा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला आहे. कांगारूचं हे उग्र रूप पाहून या व्यक्तीलाही धक्का बसला.

हे वाचा-या हत्तीची फुटबॉल खेळण्याची स्टाइल तर पाहा, VIDEO पाहून व्हाल हैराण

मिळालेल्या माहितीनुसार हे कांगारू खूप मोठं होतं आणि आक्रमकही. या कांगारूला तिथून हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र ते जागा सोडत नसल्यानं अखेर त्यांनी दगड मारून उठवण्याचा निर्णय घेतला मात्र कांगारूला त्याचा राग आला आणि त्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.

कांगारूच्या या आक्रमकपणाची आणि त्यांनी व्यक्तीला दगड मारल्यानंतर शिकवलेल्या धड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. या कांगारूनं एक जोरात लाथ मारून त्यांना खाली पडल्यामुळे व्यक्ती जखमी झाला आहे. प्राण्यांना उठवण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अशा पद्धतीनं दगड मारणं हे चुकीचच आहे. अशा गोष्टी चुकूनही करू नका असं न्यूज 18 लोकमतकडून आवाहन.

First published:
top videos

    Tags: Viral video.