Home /News /viral /

कल्याण : तरुणाला कारची जबरदस्त धडक; बोनेटवरुन सिग्नलपर्यंत फटफटत नेलं, धक्कादायक Video

कल्याण : तरुणाला कारची जबरदस्त धडक; बोनेटवरुन सिग्नलपर्यंत फटफटत नेलं, धक्कादायक Video

पोलिसांच्या तपासात एक वेगळच कारण समोर आलं आहे.

    मुंबई, 4 मार्च : कल्‍याणमधून (Kalyan News) एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल (VIDEO Viral) होत आहे. यात प्रेमसंबंधित वादावरुन एका व्यक्तीला धडक देत तिला बोनेटवरून फरफटत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी सांगितलं की, घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आणि आरोपीचा तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना गुरुवारची आहे. कल्याणच्या (पश्चिम) के आधारवाड़ी चौकावर दोघांमध्ये प्रेम संबंधावरुन वाद झाला होता. नवी मुंबईला राहणारे प्रवीण चौधरी गुरुवारी आपल्या मित्राला भेटायला आले होते. यादरम्यान प्रवीणवर काही कारणास्तव नाराज असलेले त्रिवेशदेखील तेथे पोहोचले. यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर जेव्हा प्रवीण तेथून जाण्याचा प्रयत्न करीत होता, तर त्रिवेश त्याच्या कारसमोर उभा राहिला. मात्र प्रवीणने कार थांबवली नाही आणि त्याने कार पुढे घेतली. हा सर्व घटनाक्रम स्थानिकांनी आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रवीणने कार पुढे केली तर त्रिवेश बोनेटवर अडकला. मात्र तरीही प्रवीणने कार थांबवली नाही. काही सेकंद त्रिवेश असाच राहिला आणि मग खाली पडला. दुसरीकडे प्रवीण तेथे थांबला नाही आणि घटनास्थळाहून फरार झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kalyan, Shocking video viral

    पुढील बातम्या