• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बाइकवर चौघांबरोबर पाचव्याला बसविण्यासाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून व्हाल हैराण!

बाइकवर चौघांबरोबर पाचव्याला बसविण्यासाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून व्हाल हैराण!

हा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकजणं तर हा शक्तिमान असल्याचं म्हणत आहेत.

 • Share this:
  एका बाइकवर दोन किंवा अनेकदा तीन लोक बसून जाताना आपण सर्रास पाहतो. तसं पाहता कारमधून 4 ते 5 लोक बसू शकतात. मात्र तुम्ही बाइकवरुन 5 लोकांना बसून (five people on a bike) बसून जाताना पाहिलं आहे का? आई-वडील आणि त्यांच्यासोबत बसलेली लहान लहान मुलं यांना बाइकवर बसलेली पाहिलं असेल. मात्र ज्या पद्धतीने येथे येथे बाइकवर बसलेले आहे, ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जलद गतीने व्हायरल होत आहे. जो पाहून हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये एका बाइकवर 5 लोक बसलेले आहेत. लोकांकडून हा व्हिडिओ खूुप पसंत केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगूसामी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच त्यांनी मजेशीर मेसेजही लिहिला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाइकवर पहिल्यांदा चार लोक बसतात. तेव्हा पाचवी व्यक्ती बाइकवर बसण्यासाठी जागा शोधू लागतो. यानंतर बाइकवर बसलेले लोक त्याला काहीतरी सांगतात. त्यानंतर पाचवी व्यक्ती बाइकवर आडवी होतो. आपण पाहू शकता की कशी ही पाचवी व्यक्ती चौघांच्या हातावर आरामात बाइकवर झोपला आहे. हे ही वाचा-VIDEO - हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल; वेटरने जे केलं ते पाहून अंगावर येईल काटा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ खूप पसंत करीत आहेत आणि यावर मजेशीर कंमेट्सही करीत आहेत. अनेकांनी तर याला शक्तिमानची बुद्धी असल्याचं लिहिलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: