Home /News /viral /

नवरीच्या सरप्राइझचा वाजवला बँड! रिसेप्शनमध्ये भावंडांचा प्रताप पाहून झाली शॉक

नवरीच्या सरप्राइझचा वाजवला बँड! रिसेप्शनमध्ये भावंडांचा प्रताप पाहून झाली शॉक

नवरदेवाला सरप्राईझ द्यायला जाणारी नवरी स्वतःच सरप्राइझ होते.

  मुंबई, 05 सप्टेंबर : आपल्या लग्नाबाबत (Wedding video) नवरा-नवरीचीही (Bride Groom Video) काही स्वप्नं असतात. दोघंही आपल्या जोडीदाराला काहीतरी सरप्राइझ (Wedding surprise) द्यायचं असं ठरवतात. एका नवरीने आपल्या नवरदेवाला (Wedding dance) असंच सरप्राइझ द्यायचं ठरवलं (Bride groom dance). पण तिच्याच भावंडांनी तिच्या सरप्राइझचा बँड वाजवला आणि ऐन क्षणालाच तिला भावंडांचा हा प्रताप समजला. दृष्टि पटेल या नवरीने आपला नवरदेव डॉ. राजन पटेलला सरप्राइझ देण्याचा प्लॅन केला. तिने नवरदेवासाठी छान डान्स ठरवला होता. लग्नाच्या दिवशी ती स्टेजवर मोठ्या उत्साहात जाते आणि डान्स सुरू करते. तितक्यात तिचा नवरासुद्धा तिच्या मागून येतो आणि मग काय दोघांचाही डान्स सुरू होतो.
  View this post on Instagram

  A post shared by Weddingz.in (@weddingz.in)

  नवरदेवाला सरप्राईझ द्यायला जाणारी नवरी स्वतःच सरप्राइझ होते. नवरदेवाचा डान्स पाहून तिला झटकाच बसतो. कारण तो अगदी तिच्यासारख्याच डान्स स्टेप्स करत असतो. खरंतर तिने या डान्सचा सराव त्याच्यासोबत केलाच नव्हता. तिने त्याच्यासाठी हा सरप्राइझ डान्स ठरवला होता. तरीसुद्धा असं कसं याचा विचार करून सुरुवातीला ती गोंधळतेच. हे वाचा -  चाललंय तरी काय? भरमंडपातच मेहुणीने नवरदेवाला केला असा इशारा; VIDEO VIRAL रिसेप्शननंतर त्यांना हा सर्व गोंधळ समजतो. खरंतर नवरीच्या भावंडांनी तिलाच मोठं सरप्राइझ दिलं होतं. तिच्या भावंडांनी नवरा आणि नवरी दोघांनाही एकाच गाण्यावर सारख्या स्टेप्स शिकवल्या होत्या. पण तेव्हा ते दोघं सोबत नव्हते. म्हणजे त्यांना त्यांच्या नकळत एकमेकांना समोरासमोर न ठेवता हा डान्स बसवण्यात आला होता. जेणेकरून दोघंही जेव्हा स्टेजवर एकत्र नाचतील तेव्हा त्यांच्या स्टेप्स सारख्याच असतील. हे वाचा -  रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल जेव्हा दोघंही डान्स करून एकमेकांना सरप्राइझ द्यायला गेले तेव्हा दोघंही एकमेकांच्या डान्सने सरप्राइझ झाले पण ते सारखे नाचत होते म्हणून. नवरा आणि नवरदेवाच्या भावंडांनी नवरा-नवरीसोबत केलेला हा एक प्रँक होता. नवरीच्या भावंडांनी नवरीच्या सरप्राइझचा चांगलाच बँड वाजवला होता.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Relationship, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या