Home /News /viral /

नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO

नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO

बुटासाठी नवरदेव-मेहुणी लग्नमंडपातच भिडले.

  नुंबई, 18 सप्टेंबर : नवरा-नवरी (Bride groom video) यांच्याप्रमाणे लग्नात (Wedding video) चर्चेत असतात ते दीर (Brother in law) आणि मेहुणी (Sister in law). म्हणजे नवरदेवाच्या मेहुणीचा (Jija saali video) तर काय बहिणीच्या लग्नात वेगळाच तोरा असतो. लग्नातील बूट चोरीचा (Jutta chori video) खेळ म्हणजे आपला हक्कच आहे असं मानणाऱ्या कितीतरी मेहुण्या नवरदेवाच्या बुटांसाठी (Jutta chupai video) अडून बसतात. बूट चोरण्यासाठी त्या काहीही करू शकतात (Jija saali fight video). अशाच एका बूटचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरदेव आणि त्याची मेहुणी बुटांसाठी भांडताना दिसत आहेत. बूट चोरीमध्ये नवरदेवाच्या नकळत नवरीची बहीण किंवा मैत्रिणी त्याचे बूट चोरतात आणि ते परत करण्यासाठी नवरदेवाकडून पैसे मागून घेतात. पण इथं मेहुणीने बूट चोरले नाही तर चक्क नवरदेवाच्या पायातून खेचून काढले आहेत.
  द शादी स्वॅग इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहे.  मेहुणी आपल्या भावोजींकडून बूट मागते. पण नवरदेव तिला बूट देण्यास नकार देतो. शेवटी मेहुणी खाली बसते आणि भावोजीचा पाय धरून त्याच्या पायातील बूट खेचून काढते. अखेर ती नवरदेवाच्या एका पायातील बूट काढते. नंतर तिला आठवतं की दुसरा बूट घेतलाच नाही. ती पुन्हा खाली वाकते तेव्हा नवरदेव तो बूट द्यायला तयार होत नाही, शेवटी तो स्वतःच आपल्या पायातील बूट काढून तिच्या हातात देतो. हे वाचा - नवरीबाई जोमात! मंडपातच मारला असा शॉट, क्लीन बोल्ड झाला नवरा; Video viral बूट चोरल्यानंतर पैशांसाठी मेहुणी-भावोजीतील असा मजेशीर वाद तुम्ही पाहिला असेल. पण बूटचोरीतच असा वाद कधीच पाहिला नसेल. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एरवी नवरदेवाचे मित्र किंवा भाऊ नवरदेवाचे बूट चोरी होऊ नयेत म्हणून नवऱ्याच्या मेहुण्यांवर लक्ष ठेवून असतात. नवरदेव शक्यतो यात पडत नाहीत. असं क्वचितच पाहायला मिळतं, जिथं नवरदेव आपल्या बुटांसाठी भांडतो. याआधीसुद्धा असाच एक बूटचोरीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मेहुणीने बूट चोरी करताच नवरदेवाने असा धिंगाणा घातला की पैसे न घेताच मेहुणीला बूट परत करावे लागले.
  rajnesh_meena_083 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एका ठिकाणी बसले आहेत. नवऱ्याचे मित्रही त्याच्यासोबत आहेत. नवऱ्याने आपले बूट शेजारीच काढून ठेवले आहेत. इतक्यात हळूच दरवाजातून त्याची मेहुणी येते आणि त्याचे बूट चोरून नेते. नवरदेव जमिनीवर अक्षरश: लोळण घेतो. लहान मुलांचा एखादा हट्ट पूर्ण केला नाही की ते कसे जमिनीवर आपले हातपाय आपटून लोळत रडतात. तसाच हा नवरदेवही ओरडतो, रडतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावरील फेटाही पडतो. त्याला असं करताना पाहून त्याचा मित्रही घाबरतो. तो लगेच दरवाजातून बाहेर जातो आणि बूट घेऊनच परत येतो. तो नवरदेवाच्या हातात बूट देतो आणि त्याचा पडलेला फेटा त्याच्या डोक्यावर घालतो. बूट मिळताच नवरा आपला ड्रामा थांबवतो आणि बूट हातात घेऊन, छातीशी कवटाळून धरून शांत बसतो. हे वाचा - ...अन् नवरदेवावर भडकली मेहुणी, भरमंडपातच केला तमाशा; VIDEO VIRAL नवऱ्याने सॉलिड ड्रामा करून आपले बूट परत मिळवले आहेत. यासाठी त्याला मेहुणीला पैसेही द्यावे लागले नाहीत. पैसे ने देताच आपले बूट परत मिळवण्याची नवऱ्याची ही शक्कल नेटिझन्सना चांगलीच आवडली आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या