Home /News /viral /

अरेरे! पठ्ठ्यानं BMWला केलं कचरा गाडी, कारण वाचून व्हाल हैराण

अरेरे! पठ्ठ्यानं BMWला केलं कचरा गाडी, कारण वाचून व्हाल हैराण

BMWला केलं कचरापेटी, गाडीतून उचलतो रस्त्यावरचा कचरा; कारण वाचून विश्वास बसणार नाही.

    रांची, 24 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केल्यानंतर लोकं गांभीर्यानं स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत. मात्र झारखंडच्या रांचीमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. इथं एक व्यक्ती आपल्या लक्झरी कार BMWमध्ये रस्त्यावरचा कचरा उचलताना दिसला. रांचीचा तरुण प्रिन्स श्रीवास्तव आपल्या ड्रीम कारमध्ये कचरा उचलताना दिसला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं. प्रिन्स श्रीवास्तव नावाच्या या तरुणानं यांनी आपल्या वडिलांना भेटवस्तू देण्यासाठी BMW कार खरेदी केली. मात्र BMW गाडी घेतल्यापासून गाडीला काही ना काही होत होते. बीएमडब्ल्यू सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यानंतरही ही महागड्या लक्झरी कार नीट झाली नाही. ज्यामुळे प्रिन्स खूप अस्वस्थ झाला होता. प्रिन्सला आपली बीएमडब्ल्यू कार दुरुस्त करण्यासाठी बराच खर्च करावा लागला. इतकेच नाही तर प्रिन्स वर्कशॉप मालकाच्या वागणुकीलाही कंटाळला होता. म्हणून प्रिन्सनं आपली गाडी कचरा उचलण्यासाठी ठेवून दिली. वाचा-VIDEO वाघाने रस्त्यावरच ठोकली बैठक; एका तासापर्यंत नागरिकांनीही रोखून धरला श्वास वाचा-Cadbury Chocolate : सेल्समनच्या 'या' भारी कल्पनेमुळे कंपनीची वाढली विश्वासार्हता प्रिन्स म्हणाला की, क्रिकेटपटू ईशान किशनचीही अशीच तक्रार आहे. त्यांनाही कारमुळे अशाच समस्यांचा सामना करावा लागला. कार सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीशी संबंधित बर्‍याच समस्या येत होत्या. वारंवार तक्रारी करूनही रांची येथे सर्व्हिसिंग सेंटर व शो-रूम व्यवस्थापनाकडून कोणतीही मदत प्रिन्स यांना मिळाली नाही, त्यामुळे कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला. वाचा-रतन टाटा यांनी आपल्या आवडत्या श्वानाचं नाव ठेवलं 'गोवा', कारण वाचून कराल कौतुक प्रिन्स असेही म्हणला की, जर लवकरच त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नाही तर ते सर्वांसोबत मिळून बीएमडब्ल्यू कारमध्ये कचरा उचलतील, एवढेच नाही तर प्रिन्स लवकरच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या