भयंकर! 17 वर्षीय युवततीच्या पोटातून काढले तब्बल 7 किलो केस

भयंकर! 17 वर्षीय युवततीच्या पोटातून काढले तब्बल 7 किलो केस

सर्जन डॉक्टर जीएन साहू म्हणाले की केसांचा गोळा काढण्यासाठी 6 तास लागले.

  • Share this:

बोकारो (झारखंड), 04 सप्टेंबर : सतत पोटात दुखण्याचं कारण अनेक उपाय करून सापडलं नाही तर शेवटी सोनोग्राफी करण्याचा पर्याय उरतो. या रिपोर्टमधून जी धक्कादायक बाब समोर आली ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. तरुणीच्या पोटात केस जमा झाल्याचं त्यांना सोनोग्राफीमध्ये दिसून आलं.

तरुणीच्या पोटात दुखायला लागलं. त्यामुळे सर्व पर्यायाअखेरीरीस सोनोग्राफी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. तरुणीच्या पोटात चक्क केस अडकल्याचं दिसून आलं. डोक्यावरचे केस जेव्हा गळायला लागतात आणि ते खाण्यात किंवा जेवणात सापडतात तेव्हा आपल्याला किळस वाटते. पोटात जाण्याची भीती वाटते त्यामुळे आपण प्रत्येकवेळी सतर्क असता मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

17 वर्षीय तरुणीच्या पोटातून ऑपरेशन करून तब्बल 7 किलो केस डॉक्टरांनी काढले आहेत. ही धक्कादायक घटना झाडखंड इथल्या बोकारो जिल्ह्यात घडली असल्याची माहिती समोर आली आहे. हे ऑपरेशन खूप मोठी रिस्क होती. मात्र डॉक्टरांनी ही शस्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

हे वाचा-भरधाव जीपने दुचाकीला उडवलं, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. साहू यांच्या माहितीनुसार या महिलेचे लहानपणे खूप केस गळायचे आणि तिला केस खाण्याची सवय होती. मागच्या 5 वर्षांत ही सवय सुटली मात्र अचानक पोटात दुखण्याचा त्रास जाणवू लागला. हा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. सोनोग्राफीमधून या तरुणीच्या पोटात केसांचा गोळा दिसून आला.

बोकारो येथील खासगी रुग्णालयात ऑपरेशन झाले. सर्जन डॉक्टर जीएन साहू म्हणाले की केसांचा गोळा काढण्यासाठी 6 तास लागले. डॉ साहू म्हणाले की, आपल्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत प्रथमच पोटात केस जास्त प्रमाणात जमा होण्याची अशी घटना त्यांनी पाहिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 4, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या