नवी दिल्ली, 1 जानेवारी : अमेरिकन गायिका, अभिनेत्री, नृत्य कलाकार जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) हिने नवीन वर्षाच्या (New Year 2021) निमित्ताने लाइव्ह कार्यक्रम केला होता. जेनिफरने या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये गायिका स्टेजवरुन उडी मारताना दिसत आहे आणि हातात माईक घेऊन डान्स करू लागते. जेनिफरने व्हिडीओ शेअर करीत लिहिलं आहे की, 2010 वर्ष असं असेल..या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओत जेनिफरचा स्टंट पाहून लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर 1 तासाच्या आत 22 लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत आणि चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
जेनिफर गायिकेबरोबरच एक यशस्वी अभिनेत्रीदेखील आहे, लवकरच ती 'द सायफर' चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात तिच्यासोबत एलीना गोल्डस्मिथ थॉमस आणि बेनी मेदिना दिसणार आहेत. जेनिफरला (Jennifer Lopez) शेवटचं 'हसलर्स' या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. हा चित्रपट एका क्राईम ड्रामावर आधारित होता. या चित्रपटात जेनिफर व्यतिरिक्त लिली रीनहर्ट, ज्युलिया स्टिल्स, केके पामर, कार्डी बी सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. जेनिफरचा रोमँटिक कामेडी ड्रामा चित्रपट 'मॅरी मी' यावर्षी 14 मे रोजी रिलिज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Singer