JEE Main 2020 : हौसेला मोल नाही! 100% मिळवूनही 'या' एका कारणामुळे पुन्हा परीक्षा देणार जुळे भाऊ

JEE Main 2020 : हौसेला मोल नाही! 100% मिळवूनही 'या' एका कारणामुळे पुन्हा परीक्षा देणार जुळे भाऊ

असं कोण करतं? 100 टक्के मिळूवनही पुन्हा देणार परीक्षा.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : परीक्षांना उपस्थित राहणे आणि चांगले गुण मिळवणे असा छंद असू शकेल असे जर तुम्हाला सांगितले तर? विश्वास देखील बसणार नाही. एकीकडे मुलांना अभ्यासाला बस असे पालकांना सांगावे लागते, मात्र दुसरीकडे दिल्लीच्या जुळ्या भावांना अभ्यास खुप झालं असे पालकांना सांगावे लागते. मुख्य म्हणजे निशांत आणि प्रणव अग्रवाल या भावांनी देशातील कठिण अशा JEE स्पर्धेत 100 आणि 99.93 टक्के अनुक्रमे मिळवले. यात निशांत 100 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला.

वाचा-'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser रिलीज

परीक्षेच्या तयारीसाठी या निशांत आणि प्रणव या 17 वर्षांच्या मुलांनी रोज 10-10 तास खर्च करून अभ्यास केला. एकत्र तयारी करूनही निशांत आपल्या भावाच्या पुढे निघाला. यामुळे प्रणवला एप्रिलच्या सत्रात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रणव आणि निशांत यांना पहिल्यापासूनच अभ्यास करण्याची आवड आहे. त्यामुळं दोघं सतत परीक्षा देत असतात. आता एप्रिलमध्ये होणाऱ्या JEEसाठी पुन्हा प्रणव परीक्षा देणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे निशांत 100 टक्के गुण मिळवूनही पुन्हा परीक्षा देणार आहे.

वाचा-फेसबुकवर पत्नी करायची VIDEO शेअर, फॉलोअर्स वाढले म्हणून चिडून पतीने केलं खल्लास

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत निशांत आणि प्रणव यांनी पुन्हा परीक्षा देणार असल्याचे सांगितले. या दोघांना आयआयटीमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यासाठी त्यांनी 10 ते 12 तास अभ्यास केला. निशांतने कोणते क्षेत्र निवडायचे हे अद्याप ठरवले नाही आहे. तर प्रणव कम्प्युटर सायन्स घेणार आहे.

वाचा-'बाबा जिवंत असते तर...' वडिलांचं छत्र गमावलेल्याचे शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी

First published: January 21, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या