Home /News /viral /

नशीब की चमत्कार! भरधाव Train ने उडवलं तरी JCB ड्रायव्हरला साधं खरचटलंही नाही; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

नशीब की चमत्कार! भरधाव Train ने उडवलं तरी JCB ड्रायव्हरला साधं खरचटलंही नाही; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

Train Jcb accident video : ट्रेन आणि जेसीबीची भयंकर अपघाताचा शेवट त्यापेक्षाही शॉकिंग आहे.

  नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : ट्रेनमुळे झालेल्या अपघाताचे (Train Accidents) बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. एखादी व्यक्ती किंवा एखादी गाडी भरधाव ट्रेनसमोर आली आणि ट्रेनची त्याला धडक बसली किंवा ट्रेनने उडवलं तर त्याची काय अवस्था होते हे तुम्ही पाहिलंच असेल. अशाच एका खतरनाक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ट्रेन आणि जेसीबीची भयंकर टक्कर झाली (Train JCB Accidents) आहे पण त्याचा शेवट मात्र त्यापेक्षाही शॉकिंग आहे. ट्रेन आणि जेसीबीचा हा अपघात कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. वेगाने येणारी ट्रेन जेसीबीला धडकली तरी जेसीबी आणि ड्रायव्हरला काहीच झालं नाही. व्हिडीओत पाहू शकता इथं बर्फवृष्टी होते आहे. चारही बाजूला बर्फच बर्फ दिसतो आहे. या बर्फावरून जेसीबी चालताना दिसतो आहे. जेसीबी ड्रायव्हर उजव्या बाजूच्या मार्गावर वळतो आणि थोडा पुढे जातो तेव्हा त्याला तिथून एक भरधाव ट्रेन येताना दिसते. तेव्हा आपण चुकून रेल्वे ट्रॅकवर आल्याचं त्याला समजतं. पण तोपर्यंत उशीर झाला असतो. ट्रेन इतकी वेगात असते की जेसीबी ड्रायव्हर जेसीबी रेल्वे ट्रॅकवरून मागे घेण्याआधीच ती त्याला धडकते. ही टक्कर इतकी जोरात आहे, की जेसीबी हवेत उडत दुसऱ्या दिशेले फिरते आणि रेल्वे ट्रॅकच्या बाहेर येते. हा अपघात पाहूनच आपल्याला धडकी भरते. हे वाचा - चिमुकली रस्ता ओलांडत असतानाच वेगात आली कार अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO पण धक्कादायक म्हणजे भरधाव ट्रेनने टक्कर दिल्यानंतरही जेसीबीला काहीच झालं नाही आणि जेसीबीचा ड्रायव्हरही सुखरूप आहे.  पण इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कुणालाही धक्का बसेल. पण हा ड्रायव्हर मात्र जेसीबी चालवत पुन्हा मागे येतो. जणू काही झालंच नाही असंच त्याच्या वागण्यावरून वाटतं. ट्रेनही काही अंतरावर गेल्यानंतर थांबते.
  ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - VIDEO - मांस सोडून मगरीने तरुणावरच केला खतरनाक हल्ला; भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद रेल्वे अपघातात जीव वाचणं म्हणजे त्या व्यक्तीचं नशीब किंवा देवाची कृपा. लोक वाचलेच तरी त्यांना अपंगत्व येतं. पण या व्यक्तीला साधी जखमही झाली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनी त्याला नशीबवान म्हटलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. rassmeshi_kota इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Accident, Train, Train accident, Viral, Viral videos

  पुढील बातम्या