मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : 62 व्या वाढदिवशी तब्बल 62 किमी धावला; तरुणांनाही लाजवेल असा वृद्धाचा जोश पाहा

VIDEO : 62 व्या वाढदिवशी तब्बल 62 किमी धावला; तरुणांनाही लाजवेल असा वृद्धाचा जोश पाहा

वय हा फक्त आकडा आहे, हे या व्यक्तीने दाखवून दिलं आहे.

वय हा फक्त आकडा आहे, हे या व्यक्तीने दाखवून दिलं आहे.

वय हा फक्त आकडा आहे, हे या व्यक्तीने दाखवून दिलं आहे.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : आपला वाढदिवस (Birthday) आपण केक कापून, पार्टी करून साजरा करतो. केकवर आपल्या वयाच्या मेणबत्त्या आपण पेटवतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका 62 वर्षांच्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. आपल्या 62 व्या वाढदिवशी ही व्यक्ती तब्बल 62 किलोमीटर धावली आहे.

वाढदिवस म्हणजे आपलं वय वाढत जातं, आपण वयस्कर होऊ लागतो, आपलं शरीर थकतं, हे वय म्हणजे आराम करण्याचं वय असं म्हटलं जातं. कित्येक जण वाढदिवशीसुद्धा तू आता आणखी एका वर्षाने म्हातारा झालास किंवा म्हातारी झालीस असं उपहासाने म्हणतात. मात्र अशाच सर्वांना खोटं ठरवलं आहे ते जसमेर सिंह संधू (Jasmer Singh Sandhu) यांनी.

जसमेर सिंह संधू यांचा  25  ऑगस्टला वाढदिवस असतो. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने करायचं त्यांनी ठरवलं. आपल्या वयाच्या आकड्याइतकं अंतर धावण्याचं लक्ष्य त्यांनी ठेवलं आणि ते गाठलंसुद्धा. जसमेर यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे वाचा - कॅलक्युलेटरपेक्षा भारी याचा मेंदू; जगातील सर्वात वेगवान भारताचा Human calculator

जसमेर यांनी सोमवारी रात्री 12 वाजता त्यांनी धावायला सुरुवात केली. 62 किलोमीटर अंतर पूर्ण होईपर्यंत ते धावतच राहिले.

जसमेर यांनी आपल्या फिटनेस ट्रॅकरचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. सकाळी 7.32 पर्यंत त्यांनी आपलं लक्ष्य पूर्ण केलं. म्हणजे तब्बल  7 तास 32 मिनिटांत त्यांनी 62 किलोमीटर अंतर पार केलं आहे.

हे वाचा - पायात बळ नसलं तरी स्वावलंबी; भलीमोठी घागर घेऊन दिव्यांग महिला भरते पाहा VIDEO

जिथं वय वाढत जाणाऱ्यांना म्हातारा-म्हातारी असं म्हटलं जातं. अशा तरुणांनाही लाजवेल असा जोश जसमेर सिंह यांच्यात दिसून आला आहे. वय हा फक्त आकडा आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

जसमेर यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेतलं आहे. त्यांना हे कसं शक्य झालं ते समजून घेतलं. इतकंच नव्हे तर काही जणांनी अशा पद्धतीनेच खरंतर वाढदिवस साजरा करावा, असंही म्हटलं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle