गर्लफ्रेंड पाहिजे! चंद्रावर फिरायला सज्ज झालेल्या अब्जाधीशाने दिली जाहिरात

गर्लफ्रेंड पाहिजे! चंद्रावर फिरायला सज्ज झालेल्या अब्जाधीशाने दिली जाहिरात

गर्लफ्रेंडसाठी चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा न करता अब्जाधीशाने थेट चंद्रावर फिरायला जाण्यासाठी गर्लफ्रेंड हवी आहे अशी जाहिरात दिली आहे.

  • Share this:

टोकियो, 13 जानेवारी : जपानचे प्रसिद्ध उद्योगपती आणि ऑनलाइन फॅशन रिटेलर जोजो कंपनीचे सीईओ यूसाको माएजावा हे चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक असणार आहेत. लववकरच अमेरिकेतील प्रायवेट स्पेस कंपनी स्पेसएक्स रॉकेटमधून ते चंद्रावर फिरण्यासाठी जाणार आहेत. पण यूसाको माएजावा यांना या ट्रिपवर एकटं जायचं नाही आहे. ते या ट्रिपसाठी सोबतीला एका गर्लफ्रेंडचा शोध घेत आहेत. यासाठी त्यांनी ऑनलाइन जाहिरात दिली आहे.

यूसाको माएजावा यांनी नुकतेच जपानी अभिनेत्रीसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता ते गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत. चंद्रावर सोबतीला येण्यासाठी गर्लफ्रेंड  हवी यासाठी त्यांनी इंटरनेटवर जाहीरात दिली आहे. त्यांनी गर्लफ्रेंडसाठी काही अटी ठेवल्या आहेत. मुलीचे वय 20 पेक्षा जास्त असावे. ती सुंदर आणि सिंगल असायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे.एका टीव्ही शोमध्ये यूसाको माएजावा यांनी म्हटलं होतं की, आयुष्यात मी एकाकी जीवन जगत होतो. यासाठी मी चंद्रावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून माझं चद्रावर प्रेम आहे आणि आयुष्याचं स्वप्नही आहे.

माएजावा यांनी जाहीरातीत असं लिहिलं की, मला जस हवं होतं तसं आयुष्य आतापर्यंत जगलो आहे आणि इथून पुढंही तसंच जगेन. माझं वय आता 44 आहे. मी आता एकाकी आणि एकटेपणा अनुभवत आहे. एक गोष्ट आहे जी मिळवण्याचा विचार मी करतं आहे आणि ते म्हणजे एखाद्या महिलेचं प्रेम. आयुष्यातला एकटेपणा घालवण्यासाठी ते गरजेचं आहे. गर्लफ्रेंडसाठीची जाहीरात शेअर करताना त्यांनी म्हटलं की, चंद्रावर फिरायला जाणारी पहिली महिला का होऊ नये?

अब्जाधीशाने घेतला ट्विटर फॉलोअर्सना 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय

गर्लफ्रेंड होण्यासाठी अर्ज करण्याची तारीख 17 जानेवारी पर्यंत आहे. यानंतर शॉर्टलिस्ट कऱण्यात आलेल्या मुलींच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर गर्लफ्रेंडची निवड केली जाईल.

यूसाको माएजावा 2023 मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात चंद्रावर फिरायला जातील. एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स सर्व तयारी करत आहे. या ट्रिपवर ते एका आर्टिस्टलासुद्धा घेऊन जाणार आहेत.

36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moon
First Published: Jan 13, 2020 02:32 PM IST

ताज्या बातम्या