Home /News /viral /

एवढ्या बर्फाचं काय करावं म्हणून बनवली कार, PHOTO पाहिल्यावर Lamborghini विसराल

एवढ्या बर्फाचं काय करावं म्हणून बनवली कार, PHOTO पाहिल्यावर Lamborghini विसराल

भन्नाट आयडिया! बर्फापासून बनवली शानदार कार.

    श्रीनगर, 22 जानेवारी: जम्मू काश्मीरमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अशा बर्फाचं कारयचं काय हा प्रश्न पडला असतानाच एका तरुणाला भन्नाट कल्पना सुचली. या तरुणाने बर्फाची कार तयार केली.या कारची जगभरात चर्चा सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील जुबेर अहमद (Zubair Ahmad)या तरुणाने ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. जुबेर अहमदने तयार केलेल्या या कारचे फोटो एका वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. जुबेर अहमदने बर्फापासून एक कार तयार केली आहे. या कारला श्रीनगरमधील लोकांनी मोठी पसंती दिली आहे. 'मला बर्फापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला आवडतात. मी लहानपणापासून हिमवृष्टी झाल्यानंतर काही ना काही त्यापासून तयार करतो. मी बर्फापासून कोणतीही गोष्ट बनवू शकतो अगदी ताजमहालही.'अशी प्रतिक्रिया जुबेर अहमदने दिली आहे. सोशल मीडियावर अहमदच्या या कलेला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. 4 हजारहून अधिक लोकांना या फोटोंना लाईक केलं आहे. तर ट्विटरवर 542 लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुदर्शन पटनायकसारखं खूप मोठा होऊ शकतो. असंही नेटकऱ्यांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. सुदर्शन पटनायक हे सॅण्ड आर्ट करणारे कलाकार आहेत. त्यांच्यासारखं तू मोठा होशील असा विश्वास नेटकऱ्यांनी कलाकार अहमदला दिला आहे. हेही वाचा-सावधान! फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Heavy snow fall, Jammu and kashmir, Snow fall, Srinagar, Srinagar snowfall, Viral post

    पुढील बातम्या