मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : जळगावात खडसे समर्थक, नगरसेविकेच्या मुलाला महिलांकडून प्रचंड चोप, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO : जळगावात खडसे समर्थक, नगरसेविकेच्या मुलाला महिलांकडून प्रचंड चोप, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India
  • Published by:  Chetan Patil

जळगाव, 22 जुलै : जळगावच्या मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित खडसे समर्थक हा एका नगरसेविकेचा मुलगा होता, अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे.

संबंधित प्रकार हा मुक्ताईनगरमधून समोर आला आहे. महिलांकडून ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली तो तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं अमीन शेख असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो एका नगरसेविकेचा मुलगा असल्याचा देखील दावा करण्यात येतोय. ज्या महिलांनी शेखला मारहाण केली त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करत व्हायरल केल्याच्या आरोपाखाली महिलांनी त्याला चोप दिला. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता? असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे.

(बंडखोर सुहास कांदे म्हणतात पुढची निवडणूक धनुष्यबाणावरच, आदित्यजी तुमच्या हातात पहिला शिवबंधन बांधून घ्या)

"आमचे फोटो चुकीच्या पद्धीने व्हायरल केले. त्यामुळे या नालायकाला मी मारेन. त्याने माझ्या गालावरही मारलं आहे. तो खडसे समर्थक आहे. त्याची आई नगरसेविका आहे. तुम्हाला निवडून दिलं तर चांगले कामधंदे करा. सामान्य माणसाला का त्रास देत आहात?", असा सवाल संबंधित महिलांनी केला आहे.

संबंधित व्हायरल व्हिडीओत महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. भर चौकात हा सगळा प्रकार घडला आहे. यावेळी प्रचंड गर्दी जमलेली होती. बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमलेली होती. यापैकी काहीजणांनी संबंधित घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

First published:

Tags: Crime, Eknath khadse, Jalgaon