Home /News /viral /

VIDEO: रिक्षाचालक बेशुद्ध झाला तरी त्याला फरफटत नेलं, अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक

VIDEO: रिक्षाचालक बेशुद्ध झाला तरी त्याला फरफटत नेलं, अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक

चालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनाही आरोपीनं शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमवारी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

    जबलपूर, 13 ऑक्टोबर : एका किरकोळ रस्ता अपघातानंतर रिक्षा चालकाला अशा प्रकारे मारहाण केली ही रस्त्यावरील लोकही हादरले. या मारहाणीचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर ऑटो चालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनाही आरोपीनं शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमवारी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ऑटो चालकाला बेशुद्ध होईपर्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बेशुद्ध अवस्थेतत त्याला सेटिंग प्लेटनं मारहाण करण्यात आली. ऑटो चालकाला उचलून उचलून फेकण्यात आलं. यानंतर हल्लेखोरांनी चालकाला उलटं लटकवत खेचत पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले. सोमवारी हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वाचा-5 लाखांना ऑनलाइन विकत घेतली मांजर, बॉक्स उघडला तर त्यात होता वाघाचा बछडा वाचा-पकडलं खरं पण आता चालान कशाचं कापायचं? गाडी पाहून वाहतूक पोलिसांनाही पडला प्रश्न दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेस नेते विवेक तन्खा यांनी ट्विट करुन ऑटो रिक्षाचालकाला उपचारासाठी दहा हजार रुपये द्यावे, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, 'कोण आहेत ही अमानुष लोकं? अशा प्रकारे या तरुणांना ऑटो चालक किंवा कोणालाही मारण्याचा हक्क कोणी दिला? अपघात झाल्यासही अशी वागणूक मान्य नाही. ही केवळ गुंडगिरी आहे. वाचा-शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला तालिबानी मारहाण; VIDEO मध्ये दिसतोय क्रुरतेचा कळस आधारल पोलिसांनी सांगितले की 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.15 वाजता एक युवती आपल्या लहान बहिणीसह मोपेडवर बसून कुठेतरी जात होती. दुसऱ्या बाजूनं लोडिंग ऑटोनं (एमपी -20 एलबी 2370) मोपेडला धडकली तेव्हा, दोघी बहिणी खाली पडल्या, त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र त्यानंतर दोन तरुणांनी ऑटो चालकाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या