याला म्हणतात नशीब! Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10

याला म्हणतात नशीब! Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10

ऑनलाइन शॉपिंगमध्ये कधी कधी गोंधळही होतो. एका ग्राहकानं मागवलेली वस्तू दुसऱ्या ग्राहकाला पाठवली जाते किंवा आपण मागवलेली वस्तू न येता भलतीच कोणती तरी वस्तू येते.

  • Share this:

आज काल ई कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping)करता येते. घसघशीत सूट, भरपूर व्हरायटी, वस्तू परत देण्याची सोपी पॉलिसी आणि घरबसल्या खरेदी करण्याची सोय यामुळं आजकाल अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा आदी कंपन्या लोकप्रिय आहेत. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरली आहे. या ऑनलाइन शॉपिंगमध्ये कधी कधी गोंधळही होतो. एका ग्राहकानं मागवलेली वस्तू दुसऱ्या ग्राहकाला पाठवली जाते किंवा आपण मागवलेली वस्तू न येता भलतीच कोणती तरी वस्तू येते.

असाच अनुभव नुकताच मुंबईच्या (Mumbai)लोकेश डागा(Lokesh Daga)यांना आला. त्यांनी अॅमेझॉनवरून(Amazon) माउथवॉश(Mouthwash)मागवला होता; पण त्यांना आला चक्क रेड मी नोट 10 (Red mi Note 10) हा मोबाइल (Mobile). ट्विटरवरून(Twitter)त्यांनी हा किस्सा शेअर केला असून, अॅमेझॉनलायाबद्दल कळवलं आहे. डागा यांनी आपल्या ऑर्डरचे डिटेल्सही दिले आहेत. त्यांनी दहा मे रोजी 396 रुपये किमतीच्या कोलगेट माउथवॉशच्या (Colgate Mouthwash)चार बॉट्ल्स मागवल्या होत्या. त्याऐवजी त्यांना पार्सलमधून रेडमी इंडिया नोट 10 हा 13 हजार रुपये किमतीचा मोबाइल मिळाला. पार्सलवर त्यांचच नाव असल्यानं त्यांनी ते स्वीकारलं,पण उघडून बघितल्यावर त्यांना आत हा फोन असल्याचं आणि त्यासोबत असलेल्या इनव्हॉईसवर मात्र तेलंगण(Telangana)इथल्या एका व्यक्तीचा नाव, पत्ता असल्याचं आढळलं. डागा यांनी मागवलेले माउथवॉश हे कन्झ्युमेबल प्रॉड्क्ट (Consumable Product) असल्यानं ते परत करता येत नाही. त्यामुळं रिटर्नच्या ऑप्शनमधून डागा यांना फोन रिटर्न करण्याचीही रिक्वेस्ट टाकता येत नाही. त्यामुळं अॅमेझॉन या गोंधळाची दखल घ्यावी आणि ही वस्तू त्याच्या ग्राहकाकडे पाठवावी अशी विनंती त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. या संदर्भात त्यांनी अॅमेझॉनला ईमेलही केला आहे.

हे ही वाचा-विषारी साप पकडता पकडता अचानक लुंगी सोडली आणि...; VIDEO पाहून लोक झालेत हैराण!

अशा प्रकारच्या घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मार्च महिन्यात चीनमधील (China) लियू (Liu) नावाच्या महिलेनं 1500 डॉलर्स भरून आयफोन 12 प्रो मॅक्स (iPhone 12 Pro Max) हा फोन ऑनलाइन मागवला होता. या नवीन फोनची ती आतुरतेनं वाट पाहत होती. प्रत्यक्षात तिला पॅकेज मिळाले तेव्हा मात्र तिला मोठा धक्का बसला. कारण आयफोनच्या बॉक्समध्ये तिला अॅपलच्या चवीच्या योगर्टची (Yogurt) बाटली आली होती. एरवीईबे किंवा अ‍ॅमेझॉनसारख्या थर्ड पार्टी विक्रेत्यांकडून वस्तू देताना होणाऱ्या असे गोंधळ समजू शकतो; मात्र या महिलेनं आपण अॅपलच्या अधिकृत साइटवरून ऑर्डर दिल्याचा दावा केला असून तरीही अशी फसवणूक झाल्यानं खळबळ माजली आहे. लियूनं या घटनेचा व्हिडिओ चिनी सोशल मीडिया साइट वेइबोवर (Weibo) अपलोड केला आहे. त्यानंतर, अॅपल आणि कुरिअर सर्व्हिस कंपनी एक्सप्रेस मेल सर्व्हिसया दोन्ही कंपन्यांनीया प्रकरणाची चौकशी करत असल्याचं सांगितलं असून, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार,या महिलेचे पॅकेज थेट तिच्याकडे पाठवण्यात आले नव्हते. ते स्टोअरेज युनिटकडे पाठवण्यात आले, तिथून पुढे नेण्यात आलं. यात पुढं काय झालं ते अद्याप समजलेलं नाही.

First published: May 14, 2021, 7:43 PM IST
Tags: amazon

ताज्या बातम्या