Home /News /viral /

अर्रर्रर्र! Underwear न घालताच रेसच्या मैदानात उतरला खेळाडू; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

अर्रर्रर्र! Underwear न घालताच रेसच्या मैदानात उतरला खेळाडू; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

अंडरवेअर न घालताच धावण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या खेळाडू Oops moment चा शिकार झाला.

    मुंबई, 05 ऑगस्ट : कोरोनाच्या महासाथीनंतर आता कॉमनवेल्थशिवाय बऱ्याच देशांमध्ये चॅम्पियनशिप्स सुरू झाल्या आहेत. कोलंबियातही अशीच 2022 वर्ल्ड अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशीप सुरू आहे. या स्पर्धेतील रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. याचं कारणही विचित्र आहे. एक खेळाडू अंडरवेअर न घालताच रेसच्या मैदान उतरला त्यानंतर त्याची काय अवस्था झाली, ते या व्हिडीओत दिसून येईल. इटलीतील हा 18 वर्षांचा खेळाडू. ज्याचं नाव अलबर्टो नोनिनो असल्याचं सांगितलं जातं आहे. जो धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाला. पण त्याने एक छोटीशी चूक केली जी त्याला चांगलीत महागात पडली. अंडरविअर न घालता तो रेसच्या मैदानात उतरला आणि तो उप्स मुव्हमेंट्सचा शिकार झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला सर्व खेळाडू धावताना दिसतात. सर्वजण फुल्ल जोशात असतात. सर्वात पुढे जाण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण थोड्या वेळाने एका खेळाडूचा वेग कमी होता. त्याचा हात त्याच्या प्रायव्हेट पार्टकडे जातो. प्रायव्हेट पार्टवर तो हात ठेवतो. धावण्याच्या वेगापेक्षा त्याचं प्रायव्हेट पार्टकडे जास्त लक्ष असतं. कारण त्याने शॉर्ट घातली पण त्याच्या आत अंडरवेअर घातली नाही. हे वाचा - VIDEO - लग्नासाठी घेतली मोठी रिस्क! उतावळ्या नवरदेवाची वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उडी शॉर्ट सैल असल्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट पँटमधून बाहेर येत होता. त्यामुळे ते लपवण्यासाठीच त्याची धडपड सुरू होती. प्रायव्हेट पार्ट हाताने झाकण्याची वेळ त्याच्यावर ओढावली. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर या खेळाडून सुरुवात जोशात केली. आपल्या दोन प्रतिस्पर्धांनाही त्याने मागे टाकलं होतं. पण नंतर स्वतःची लाज राखता राखता त्याचा वेग कमी झाला. त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी पुढे गेले आणि त्याने फिनिशिंग लाइनला सर्वात शेवटी स्पर्श केला. सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हे वाचा - 'खूप वाईट गातोस'; म्हणत पोलिसांनी सोशल मीडिया स्टारला केलं पोलीस स्टेशनमध्ये बंद अंडरवेअरशिवाय फक्त शॉर्टवरच तो तब्बल 400 मीटर धावला. स्पोर्ट्स जर्नलिस्ट David Sanchez de Castro आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sports, Viral, Viral videos

    पुढील बातम्या