मुंबई 23 जानेवारी : अशा काही गोष्टी सायन्समुळे घडू शकल्या आहेत किंवा तयार करता येणं शक्य झालं आहे ज्याच्या वापराने माणसाचं आयुष्य अगदी सोप झालं आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. फोन, मिक्सर, कंप्यूटर, इस्त्री, गाडी, विमान इत्यादी. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा या गोष्टी माणसांना संकटात टाकतात.
सध्या अशीच एक बातमी समोर आली आहे. जी ऐकून आणि पाहून तुम्हाला खरंच धक्का बसेल. ही घटना एस्केलेरशी संबंधीत आहे. एस्केलेटर किंवा सरकते जिने तुम्ही स्टेशन, मॉल, मेट्रो, विमानतळाजवळ पाहिले असणार. अनेकांनी याचा वापर देखील केला असणार.
हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल
या जिन्यांमुळे लोकांना पायऱ्या चढायचा त्रास वाचतो आणि काही सामान असेल तरी तुम्ही त्याला नीट विना मेहनत घेऊन प्रवास करु शकता. पण यासंबंधी एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पुन्हा या एस्केलेटरवरुन प्रवास करताना शंभरदा विचार कराल.
ही घटना भारतातील नाही, ही इस्तानबुल मधील आहे.
स्टेशनवर प्रवास करत असताना एक व्यक्ती एस्केलेटरवर चढला आणि तो मशिनच्या आत पडला आणि अडकला.
जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसेल की एस्केलेटरच्या पायऱ्यांमध्ये अचानक एक मोठा गॅप तयार होतो. ज्यानंतर सर्वात मागे उभा असलेली व्यक्ती त्या गॅपमध्ये पडते. कारण अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे एस्केलेटर खराब होतं आणि त्याच्या शिड्यांचा भाग अचानक गायब होतो. ज्यामुळे ही मागे उभी असलेली व्यक्ती त्यामध्ये पडते.
हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे आणि हजारो लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना फेब्रुवारी 2018 मध्ये तुर्कीच्या इस्तंबूलमधील अयाजगा मेट्रो स्टेशनवर घडली होती. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.
मेहमेट अली एरिक असे या व्यक्तीचे नाव असून तो एस्केलेटरमध्ये तासभर अडकून पडला होता.
अनेक प्रवासी त्याच्या मदतीसाठी पुढे आले, पण त्यांना अपयश आले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवले.
नंतर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आहे. नशिबाने या व्यक्तीला फारसं काही झालेलं नाही, त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पण हा अपघात इतका मोठा होता की त्याचे प्राण देखील गेले असते.
हे ही पाहा : बाळासोबत उभे असताना पार्किंगमधील कार खाली कोसळली... पुढे काय घडलं? पाहा Video
हा व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जो लोकांना एस्केलेटरवरुन जाता काळजी घेण्यासाठी आणि अलर्ट राहण्यासाठी शेअर केला जात आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर आता हे ठरवलं आहे की ते पुन्हा कधीही एस्केलेटरने प्रवास करणार नाहीत. तर अनेकांनी हे काळजी करण्याचं कारण असल्याचं देखील म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking accident, Shocking video viral, Social media, Videos viral, Viral