वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : कॅलिफोर्नियामधील इंस्टाग्राम मॉडेल, तरुणी आणि महिलांना एक अनोखी सेवा देत आहे. ऑनलाइन असलेल्या या सेवेत एखाद्या मुलीचा बॉयफ्रेंड किंवा महिलेचा नवरा खरोखरच तिच्याशी प्रामाणिक आहे की नाही हे ओळखायला मदत करते.
पेज वूलन (Paige Woolen) असं या मॉडेलचं नाव असून ती मुलींच्या बॉयफ्रेंडला ‘डायरेक्ट मेसेज’(डीएम) पाठवून त्याच्याशी गप्पा मारते आणि तो त्या मुलीची फसवणूक तर करत नाही ना हे जाणून घेते.
तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला अनेक फॉलोअर्स आहेत. तिने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असलेल्या पुरुषांकडून मला नेहमीच मेसेज येत असतात आणि यामुळे या पुरुषांचं असं वागणं जगासमोर आणण्यासाठी काहीतरी करावसं वाटलं. त्यासाठी तिने एक वेगळं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं आहे आणि आता या पुरुषांकडून तिला आलेले मेसेजेस ती त्या नव्या अकाउंटवर पोस्ट करते. वूलनने डेली स्टार वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितलं की, काही मुलींना माहीत होतं की, त्यांचा बॉयफ्रेंड इतर बायकांना मेसेज पाठवतो आणि ते पाहून मी अवाक झाले.
"dudesinthedm" नावाच्या एका वेगळ्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, पुरुषांनी तिला पाठवलेल्या वाईट कमेंट्सचे फोटोज वूलन पोस्ट करते. आपला बॉयफ्रेंड फसवतोय असा संशय असलेल्या मुलींच्या बॉयफ्रेंडला फेक मेसेज पाठवून तो प्रामाणिक आहे की नाही हे तपासण्याची ऑफरही वूलनने मुलींना दिली आहे. यासाठी वूलन त्या बॉयफ्रेंडला डायरेक्ट मेसेज पाठवून लाडीगोडीत बोलते आणि त्याचा त्या पुरुषावर काही परिणा होतो की नाही हे बघते.
यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी विचारल्यानंतर तिला रिप्लाय देणं थांबवलं, तर पेज म्हणाली की, बरेच जण त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहतात आणि या माझ्यासोबत जास्त काही संबंध ठेवत नाहीत.
काहींनी मात्र तिला डेटवर बाहेर नेण्यासाठी सिंगल असल्याचंही संगितलं. वूलनने तिला इंस्टाग्राम अकाउंटवर आलेले सर्व मेसेज डॉक्युमेंट केले आहेत आणि तिच्या या पुढाकाराला अनेकांकडून चांगला प्रतिसाद येतो आहे.
काहींनी, वूलन पुरुषांना ट्रॅप करत असल्याचा आरोप केला आहे. तर, अनेकांना असं वाटतंय की, आपल्या बायको किंवा गर्लफ्रेंडला फसवणाऱ्या मुलांना जगासमोर उघडं पाडून वूलन हिरोचं काम करत आहे. एका युजरने, वूलन देवाचं काम करत असून आणि तिला कुणाच्याही काहीही बोलण्याने फरक पडायला नको, असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram