मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्डने भुताशी बोलतोय का? VIDEO झाला व्हायरल

हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्डने भुताशी बोलतोय का? VIDEO झाला व्हायरल

हा व्हिडीओ खरा आहे की त्या सिक्युरिटी गार्डने केलेला प्रँक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

हा व्हिडीओ खरा आहे की त्या सिक्युरिटी गार्डने केलेला प्रँक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

हा व्हिडीओ खरा आहे की त्या सिक्युरिटी गार्डने केलेला प्रँक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

अर्जेंटिना, 22 नोव्हेंबर : आपल्याला घरातील ज्येष्ठ मंडळी भुतांच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतात. पण आपण मात्र भूत चित्रपट, वेब सीरिज किंवा मालिकांमध्ये पाहतो. त्यात एखादी मेलेली व्यक्ती फक्त एका ठराविक व्यक्तीला दिसते, संवाद साधू शकते, असं दाखवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण असाच काहीसा एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अर्जेंटिनातील असल्याचं म्हटलं जातंय. यात रुग्णालयातील सुरक्षा रक्षक न दिसणार्‍या व्यक्तीशी बोलत असल्याचं दिसतंय. होय, तो माणूस बोलतोय, पण त्याच्या समोर कुणीच नाहीये. त्यामुळे तो भुताशी संवाद साधतोय का, असे प्रश्न विचारत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

सर्वात आधी हा व्हिडीओ रेडिटवर शेअर करण्यात आला असून, त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

त्या रेडिट युजरने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, हे फुटेज बुएनोस आयर्समध्ये असलेल्या फिनोचिएटो सॅनेटोरियममध्ये पहाटे 3 वाजता कॅप्चर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये एक गार्ड रुग्णालयाच्या रिसेप्शनवर बसलेला असतो. तेव्हा दरवाजा ऑटोमॅटिक उघडतो, पण त्या फुटेजमध्ये कुणीही आत आल्याचं दिसत नाही.  पण त्या गार्डने मात्र कुणाला तरी आत येताना पाहिलं. कारण, तो क्लिपबोर्डसह त्या अदृश्य व्यक्तीजवळ गेला आणि त्याच्याशी बोलत त्याची माहिती घेऊ लागला. तो हातवारे करून त्याच्याशी बोलताना या व्हिडीओत दिसतंय. तसंच नंतर तो व्हीलचेअरवर बसवून ती पुढे घेऊन जात आहे असं दिसतं पण त्या व्हीलचेअरवरही कुणीही बसलेलं आपल्याला व्हिडिओत दिसत नाही. दरम्यान, हा व्हिडिओ खरा आहे की नाही, याबद्दल खात्रीशीर माहिती इंडिया टुडेने दिलेली नाही.

(तरुणाचा बैलासोबत खेळ, Video असा की पाहून नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न)

डेली स्टारच्या वृत्तानुसार, फुटेज पाहिल्यास रुग्णाची ओळख पटू शकते. कारण त्याचा आदल्या दिवशी रुग्णालयात मृत्यू झाला होता. काही जण मात्र हा व्हिडिओ पाहून घाबरले आहेत. तर काहींच्या मते हा प्रँक आहे आणि त्या सिक्युरिटी गार्डनेच एकट्याने बोलत हा प्रँक केला असू शकतो.

(मित्राच्या लग्नात साडी नेसून पोहोचले तरुण; नवरदेवाला धक्काच, पाहा Video)

“व्हिडिओत दिसतंय ते खूपच विचित्र आहे. एकतर गार्ड कॅमेर्‍यांसमोर काही तरी जोक करतोय किंवा तसं काही खरंच घडलं असू शकतं, या दोन्ही गोष्टी समजणं जरा अवघड आहे,” असं एका युजरने लिहिलंय. तर "तो फक्त एक प्रँक असेल तर त्याने डेस्क जवळून आतल्या दरवाजाला कसं ट्रिगर केलं असेल, हे खरंच कळत नाहीये," अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की त्या सिक्युरिटी गार्डने केलेला प्रँक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण युजर्समध्ये मात्र या व्हिडीओवरून चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसून येतंय.

First published: