नवी दिल्ली, 17 डिसेंबर : अमेरिकेच्या अंतराळ एजन्सी नासाने (NASA) अंतराळातून बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरांची (Snow-Covered Himalayan Peaks) एक अद्भूत झलक शेअर केली आहे. नासाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या छायाचित्रात दिल्लीदेखील चमकताना दिसत आहे.
भारताची राजधानी (City Lights Of New Delhi) रात्रीच्या वेळी चमकताना दिसली. अंतराळ एजन्सीच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) चालक दलातील एका सदस्याने हा फोटो काढला आहे.
View this post on Instagram
नासाने लिहिलं आहे की, बराच काळाच्या एक्सपोजरमध्ये बर्फाच्छादित हिमालय पर्वताचा फोटो एका नासाच्या अंतराळाच्या टीममधील सदस्याने काढला आहे. जगातील सर्वात उंच श्रृखंला, हिमालय भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटोदरम्यान 50 मिलियन वर्षांचा परिणाम आहे. छायाचित्राच्या उजवीकडे किंवा हिमालयाच्या दक्षिणेस उत्तर भारत आणि पाकिस्तानच्या शेतीचा प्रदेश आहे. एक दिवसांपूर्वी पोस्ट केल्यानंतर छायाचित्राला 1.2 लाखांहून अधिक लाइक आणि कमेंट मिळत आहे. एका इंस्ट्राग्राम वापरकर्त्याने लिहिलं आहे की, हे खूप सुंदर आहे.
या फोटोमध्ये हिमालय शिखरांचा भाग चमचमताना दिसत आहे. हा फोटो अत्यंत सुंदर असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर या पोस्टला अनेकांना शेअर केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nasa, Viral photo