नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: केक (cake) म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी हे सुटतच. मग त्यात अनेक फ्लेवर चाखायला मिळत असतात. अशातच सध्या हव्या त्या आकारातील, हवे ते नाव, फोटो असलेले केक (cake creative) तरुणाईचे आकर्षण ठरत आहेत. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर(Social Media) तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये कांद्यासारखा केक पाहायला मिळत आहे.
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने लोकांना थक्क केलं आहे. हा व्हिडिओ फूड क्रिएटर नताली साइडसर्फ हिने बनवलेल्या एका अफलातून केकचा आहे. तिची केक बनवण्याची शैली अगदी आगळीवेगळी आहे. घरगुती वस्तूंसारखे हुबेहूब दिसणारे केक ती बनवते. तिने बनवलेल्या केकचा अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात दिसणारा केक अगदी हुबेहूब कांद्यासारखा आहे.
प्रथम दृष्टिक्षेपात तर तो कांद्यासारखाच दिसतो. मात्र सुरीने कापल्यानंतर तो चक्क केक असल्याचं स्पष्ट होतं. इन्स्टाग्रामवर तिने हा व्हिडिओ शेअर केला असून, त्याला 40 लाख व्ह्यूज आणि 1 लाख 76 हजार लाइक्स मिळाले आहेत. नताली साइडसर्फचे 7 लाख 2 हजार चाहते आहेत. 2020मध्ये तिनं घरगुती गोष्टींसारखे दिसणारे केक बनवायला सुरुवात केली.
View this post on Instagram
हा ट्रेंड सुरू झाल्यापासून नताली हायपररियल केक तयार करत आहे. तिने अनेकदा तिच्या अफलातून कारागिरीने लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिच्या कांदा केकचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका प्लेटच्या मध्यभागी एक संपूर्ण कांदा ठेवलेला दिसतो. नताली त्याचे दोन तुकडे करते. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की "मी बनवलेल्या माझ्या आवडत्या केकपैकी हा एक आहे... आणि हा एक कांदा आहे.’ त्यावर एका यूझरनं 'मला थिसॉरसची गरज आहे,' अशी कमेंट केली आहे.
कांद्याची बाहेरची सालं खरी आहेत का, असा सवालही काही जणांनी केला. 'ती खरी कांद्याची सालं नाहीत. मी ती खाण्यायोग्य व्हॅनिला वेफर पेपरने बनवली आहेत. माझ्याकडे YouTube वर ते कसे बनवलं हे दाखवणारं एक ट्युटोरियल आहे,' असं नतालीने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Onion, Tasty food