VIDEO : पोलिसांच्या परेडमध्ये माकडाची एन्ट्री आणि...

VIDEO : पोलिसांच्या परेडमध्ये माकडाची एन्ट्री आणि...

हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हसून हसून लोटपोट व्हाल. या आयपीएस अधिकाऱ्याने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन देखील अत्यंत चपखल आहे. ट्विटरवर खूप वेगाने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : सोशल मीडियावर आपण अनेक हास्यास्पद व्हिडीओ दररोज पाहत असतो. काही आपण शेअर देखील करतो. पंकज नैन या आयपीएस अधिकाऱ्याने असाच एक व्हायरल व्हिडीओ आपल्या ट्विटर वॉलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हसून हसून लोटपोट व्हाल. या आयपीएस अधिकाऱ्याने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन देखील अत्यंत चपखल आहे. ट्विटरवर खूप वेगाने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक माकड पोलीस ड्रिलमध्ये पोहोचला आणि त्याने एका पोलिसाला जोरदार लाथ मारली. या माकडाची ‘अ‍ॅक्शन’ इतकी वेगवान होती आणि त्यावर पोलिसाची ‘रिअ‍ॅक्शन’ही तितकीच वेगवान होती. माकडाच्या या कृतीनंतर ड्रिल करणारे पोलीसही अचंबित झाले होते. या व्हिडीओ शेअर करणाऱ्या आयपीएस पंकज नैन यांनी अशी कॅप्शन दिली आहे की- ‘याच पद्धतीने तुमच्या ड्रिल इन्स्ट्रक्टर (उस्ताद) ला वागायला आवडेल, जर तुम्ही व्यवस्थित ड्रिल केलं नाही.’ त्यानंतर त्यांनी एक हसायची इमोजी देखील पोस्ट केली आहे

या व्हिडीओला 4 हजारपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. हजारहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे तर 100 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओवर आलेल्या कंमेट्सही तितक्याच भन्नाट आहेत. पोलीस परेडच्या वेळी रांगेच्या बाहेर असल्यामुळे माकडाने त्याला लाथ मारली अशी कमेंट काही लोकांनी केली आहे. तर काहींनी हा व्हिडीओ अगदी ‘परफेक्ट’ वेळी कुणी शूट केला असा प्रश्न विचारला आहे.

First published: February 1, 2020, 5:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या