हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा (IPS officer Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे. त्यांच्यामते हा व्हिडिओ नागालँडचा आहे. यात पोलीस लस टोचून घेण्यास लसीकरण केंद्रावर पोचतो. हेही वाचा 70 फूट खोल दरीत कोसळली कार, 5 ते 6 वेळा झाली पलटी पण तिघे तरुण बचावले, VIDEO तिथं नर्सनं त्याला स्पर्श करताच तो जोरजोरात हसू लागला. त्यावेळी त्याला लस टोचलेली नव्हती. त्याला हसताना पाहून बाकी लोकही हसायला लागले. (viral video of Nagaland police laughing as takes vaccine) हेही वाचा हत्तीवर सिंहाचा हल्ला; पण पुढे असं काही होतं की....पाहा VIRAL VIDEO साधारणतः असं चित्र असतं, की इंजेक्शनचं नाव ऐकून लोक रडायला लागतात किंवा अस्वस्थ होतात. मात्र इथं घडलं उलटंच. आयपीएस अधिकाऱ्यानं व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे, की 'नागालँडमध्ये कोविडचं लसीकरण झालेला हा व्हिडिओ. माहीत नाही, या व्यक्तीनं शेवटी लस घेतली की नाही... असं वाटतं, की त्याला खूप गुदगुल्या होत होत्या. तो सुईपेक्षा या गुदगुल्यांनी जास्त चिंतेत होता.' हा व्हिडिओ रुपीन यांनी 7 मार्चला शेअर केला. याला 500 हून जास्त व्ह्युज मिळाले आहेत.#Covid19 #Vaccination gem apparently from #Nagaland.
Not sure whether he had it finally but Looks like he was more anxious about the 'tickling' शायद सुई से नहीं , #स्पर्श की #गुदगुदी से हंगामा हो रहा था । pic.twitter.com/9ZTmX3URnc — Rupin Sharma IPS (@rupin1992) March 7, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Twitter, Viral video.